spot_img
अहमदनगरखुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा रद्द; उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

श्रीरामपूर येथील खून खटल्यातील आरोपी पराग पठारे याच्यासह इतर आरोपींना श्रीरामपूर सत्र न्यायलयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली असल्याची माहिती अ‍ॅड. एन. बी. नरवडे यांनी दिली आहे. परिस्थितीजन्य पुरावा निष्पन्न न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपींच्या विरोधातील जन्मठेपेची शिक्षा रद्द बातल ठरविली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावावत सविस्तर वृत्त असे की, सुनिल सिताराम दौंड यांनी श्रीरामपुर पोलीस स्टेशन येथे २५ मार्च २०१५ रोजी फिर्याद दिली होती होती. त्याचा भाचा गणेश गोरक्ष चांदगुडे हा शिक्षणानिमित्त मातापुर, ता. श्रीरामपुर येथे राहावयास होता. तो १२ वी मध्ये आर.बी.एन.वी. कॉलेज मध्ये शिक्षण घेत होता. १२ मार्च २०१५ रोजी मयत गणेश हा त्याचे मित्र आरोपी पराग पठारे याच्या घरी श्रीरामपुर येथे जातो असे सांगुन श्रीरामपुर येथे निघुन आला. परंतु तो घरी आला नव्हता. त्यानंतर दि. २२ मार्च २०१५ रोजी त्याचे मोबाईलवरून मयताच्या आईस फोन करून सदरील व्यक्तीने एक करोड रुपयाची मागणी केली होती.

पोलीसात तक्रार दिल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर २४ मार्च २०१५ रोजी मयताच्या आईच्या मोबाईलवर मिस कॉल आला होता. मयत गणेश मिळुन न आल्याने फिर्यादीच्या फिर्यादीनुसार श्रीरामपुर पोलीस स्टेशन येथे सुरुवातीला भा.द.वी. करून ३६३, ३८५, ३८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तदनंतर आरोपीच्या विरोधात भा.द.वी कलम ३०२ व इतर कलमाखाली आरोपी पराग पठारे व अजय दिनकर मोरे, धिरज शिंदे यांच्या विरोधात चार्ज शिट दाखल करण्यात आले होती. या संदर्भात सर्व सूनावणी श्रीरामपूर सत्र न्यायालयात झाली. २६ मार्च २०१८ रोजी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान जन्मठेपेच्या शिक्षेतील आरोपी पराग पठारे व इतर यांनी मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये वेगवेगळे अपील दाखल केले होते. आरोपी पराग मच्छींद्र पठारे यांनी अ‍ॅड. एन.बी. नरवडे यांच्या मार्फत अपील दाखल केले होते. सदरील अपीलाची सुनावणी दरम्यान उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती आर. जी. अवचट व न्यायमुर्ती आर.जी. धोटे यांच्या खंडपीठाने सर्व आरोपींचे युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपीस मृत्युच्या पुर्वी हॉटेल राजयोग येथे घेऊन गेल्याचा पुरावा निष्पन्न झाला नाही. तसेच सी.ए.रिपोर्ट मध्ये अल्कोहोलचे कन्टेंन्टस मिळुन आले नाही. आरोपी विरुध्द कुठलाही सबल पुरावा निष्पन्न होत नाही. तसेच परिस्थितीजन्य पुरावा निष्पन्न न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने आरोपींच्या विरोधातील जन्मठेपेची शिक्षा रद्द बातल ठरविली असल्याची माहिती अ‍ॅड. नरवडे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...