spot_img
ब्रेकिंगअबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीमधील मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात एकच गोंधळ केला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. राज्यातील अमरावतीत मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या ड्रीमलँडमधील एआरएन असोसिएट परीक्षा सेंटरवरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

परीक्षेवर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याकडूनच एका विद्यार्थ्यांला उत्तरे कॉपी पुरवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप केला आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं की, ‘जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टीद्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकारला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत.

‘अमरावतीच्या सेंटर ARN Associate या सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता येत नाही, तर मग परीक्षा तरी का घेता.सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. तत्काळ WCD ची परीक्षा थांबवावी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...