spot_img
देशअबब... छाप्यात सापडले दोन ट्रक नोटा; मोजता मोजता मशीनही पडले बंद

अबब… छाप्यात सापडले दोन ट्रक नोटा; मोजता मोजता मशीनही पडले बंद

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
आयकर विभागाने बुधवारी दोन राज्यांत टाकलेल्या छाप्यात इतकी रक्कम हाती लागली आहे की मोजणारी मशिनही बंद पडली. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा असून आयकर विभागाच्या या कारवाईमध्ये आणखी काय माहिती समोर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील बोलंगीर आणि संबलपूल येथील मद्य निर्मिती कंपनीच्या आवारात आयकर विभागाने बुधवारी छापे टाकले. यावेळी आयटी पथकाने मोठी रोकड जप्त केली आहे. ही रक्कम एवढी होती की दोन दिवसांत २०० आणि ५०० रुपये मोजणार्‍या मशीननेही काम करणे बंद केले.

या कारवाईत जप्त केलेल्या रक्कमेमध्ये आतापर्यंत ५० कोटी रुपये मोजले गेले आहेत. या नोटा दोन ट्रकमध्ये भरून मोजणीसाठी बँकेत पाठवल्या होत्या. बुधवारी आयकर विभागाने ओडिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणांवर छापे टाकले. तपास पथकाने ओडिशातील संबलपूर आणि बोलंगीर येथे ही कारवाई केली. झारखंडच्या रांची आणि लोहरदगा येथील कंपनीच्या परिसराचीही पथकाने झडती घेतली.

आयकर विभागाने १५० कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती आहे. ज्या कंपनीच्या कार्यालयात इतकी मोठी रक्कम सापडली ती कंपनी पश्चिम ओडिशातील सर्वात मोठी दारू उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे बौद्ध डिस्टिलरीजशी व्यावसायिक संबंध आहेत. तितलगडमधील दारू माफियांच्या घरांवरही आयटी कंपनीने छापे टाकले. मात्र, सर्व आरोपी फरार झाले. या शिवाय आणखी एका मद्यनिर्मिती कंपनीच्या कार्यालयावर आयटी पथकाने छापा टाकून ११० कोटी रुपये जप्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विखे पाटलांनी साधला शरद पवारांवर साधला; म्हणाले तुतारी फुंकून काही…

सांगोला / नगर सह्याद्री - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुतारी फुंकून कुठे...

सावधान! विनापरवाना पोस्टर्स लावणाऱ्यावर ‘ती’ कारवाई होणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरात विनापरवाना भिंतीवर, सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स, बॅनर्स लावून विद्रुपीकरण करण्याचे...

व्यापारी असोसिएशनचा आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा; मागणी काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील प्रमुख बाजारपेठेला अतिक्रमण धारकांनी विळखा घातला आहे. या अतिक्रमणांमुळे...

प्रियसीसाठी बायकोला सोडलं, मग तिसरीसोबत जुळलं, खटके उडताच नको तेच घडलं…

Maharashtra Crime News: प्रियकराने प्रियसीचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, तरूणाने गर्लफ्रेंडसाठी...