अहमदनगर | नगर सह्याद्री
भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, पिडीत तरुणी बोल्हेगाव परिसरात वास्तव्यास असून शिक्षण घेते. परिसरातील एका तरुणाने बळजबरी करत गांधीनगर, बोल्हेगाव परिसरात असणार्या एका खोलीमध्ये नेवन बळजबरीने फिर्यादीशी शारीरीक संबंध केले.
तसेच या बाद्दल कोणाला काही सांगितले तर तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी देत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तिने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गौरव जगधने (पुर्ण नाव माहीत नाही) २५ वर्षे रा-गांधीनगर, बोल्हेगाव,अहमदनगर याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.