spot_img
अहमदनगरसंगमनेरमध्ये शांततेला सुरुंग?, 'ते' व्यापाऱ्यांनाचा करताय ब्लॅकमेल?, आमदार सत्यजित तांबे मैदानात, नेमकं...

संगमनेरमध्ये शांततेला सुरुंग?, ‘ते’ व्यापाऱ्यांनाचा करताय ब्लॅकमेल?, आमदार सत्यजित तांबे मैदानात, नेमकं प्रकरण काय?

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची बाजारपेठ फुलली आहे. प्रामाणिकपणा हे आपल्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य राहिले आहे. शहर व तालुक्याच्या विकासात व्यापाऱ्यांचे योगदान आहे. एखादा चुकत असेल तर सांगा .मात्र गुणवत्तेच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रास देणे ही संगमनेर तालुक्याची संस्कृती नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने व्यापाऱ्यांना कुणीही त्रास देऊ नका असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

इंदिरानगर येथील निवासस्थानी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांना शहर मधील व्यापाऱ्यांनी विविध अडचणींबाबत व अपप्रचार आणि त्रास देणाऱ्यांबाबत निवेदन दिले. यावेळी उद्योगपती राजेश मालपाणी, अध्यक्ष योगेश कासट, ओंकार शेठ भंडारी, सुमेध संत, शरद गांडोळे ,अरुण शहरकर, जुगल किशोर बाहेती, प्रकाश राठी, मकरंद राहतेकर, संतोष कारले, गुरुनाथ बापते, मुकेश कोठारी, शैलेश मालानी, विलास दिवटे, विश्वनाथ असावा, विशाल पडतानी, अभय नेहुलकर ,गुलाब शहा, रुपेश राहतेकर , निखिल गुंजाळ आदींसह विविध व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या विविध समस्यांचे निवेदन आमदार सत्यजित तांबे यांना दिले. संगमनेर शहरातील गुळ पॅकिंग व अन्य व्यावसायिकांच्या विषयी काही लोक अपप्रचार करून संगमनेर मधील व्यापाऱ्यांची बदनामी करत आहेत. सदर गुळाचे नमुने हे अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर यांच्याकडून तपासणी करून घेतले असून हा गूळ प्रामाणिक झाल्याचे सिद्ध सुद्धा झाले आहे. मात्र तरीही काही लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी व्यापाऱ्यांना त्रास देत असल्याने समस्त व्यापाऱ्यांनी आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेतली.

यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, शहराच्या व तालुक्याच्या विकासात व्यापारी बांधवांनी योगदान दिले आहे. मागील काही काळापासून क्वालिटीच्या नावाखाली काही मंडळी व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे. जे प्रामाणिक काम करत असतील त्यांना चुकीच्या मार्गाने त्रास देणे अडचणीत आणणे हे अत्यंत दुर्दैवी आहे .

एखादा व्यापारी चुकत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. परंतु चूक नसताना व्यक्तिगत स्वार्थासाठी विनाकारण त्रास काही मंडळी देत आहेत. त्यांना कधीही पाठीशी घालणार नाही. याचबरोबर सदर मालाची तपासणी शासकीय यंत्रणा करत असते .त्यांच्या कडून प्राप्त झालेल्या अहवालावरही संशय व्यक्त करणे आणि त्रास देणे हे अत्यंत चुकीचे आहे. व्यापारी बांधवांनी प्रामाणिकपणाच्या मार्गाने एकजुटीने लढावे आपण व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहोत असे ते म्हणाले.

तर राजेश मालपाणी म्हणाले की ठराविक काही लोक मुद्दाम व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी खोटेनाटे कागदपत्र करून ब्लॅकमेल करत आहेत .याविरुद्ध सर्वांनी आमदार सत्यजित तांबे व प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. आमदार तांबे यांनी याबाबत व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे अस्वस्थ केले असून कुणी चुकीच्या मार्गाने त्रास देतच असेल तर सर्व व्यापारी एकत्र येऊन अशा प्रवृत्ती विरुद्ध लढा देतील असे ते म्हणाले. तर यावेळी जमलेल्या विविध व्यापाऱ्यांनी संगमनेर शहरांमध्ये सध्या असलेल्या अशांतता आणि असुरक्षित याबाबत चिंता व्यक्त केली यापूर्वी असे वातावरण कधीही नव्हते असेही अनेक व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...