spot_img
अहमदनगरअहमदनगर: दोन गटात तुफान राडा! 'इतके' जखमी, 'येथे' घडला प्रकार

अहमदनगर: दोन गटात तुफान राडा! ‘इतके’ जखमी, ‘येथे’ घडला प्रकार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
रॉड, कत्ती, दांडक्याने केलेल्या खूनी हल्ल्यात नऊ जण जखमी झाल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारात घडली. अजय सुभाष गवळी (वय २३ रा. शांजापुर ता. पारनेर, हल्ली रा. पिंपळगाव कौडा), आशाबाई दत्तात्रय शिंदे, सागर सुभाष गवळी, दत्तात्रय रामदास शिंदे, सुभाष बाजीराव गवळी, रामदास लक्ष्मण शिंदे, अदित्य दत्तात्रय शिंदे, अक्षय सुभाष गवळी व संगीता सुभाष गवळी (सर्व रा. पिंपळगाव कौडा) हे जखमी झाले आहेत.

जखमी अजय गवळी यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण शिवाजी गवळी, अरूण शिवाजी गवळी, शिवाजी बाजीराव गवळी, वैभव बाबा गवळी, बायजाबाई शिवाजी गवळी (सर्व रा. पिंपळगाव कौडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शनिवारी (दि. ९) रात्री नऊच्या सुमारास अजय गवळी व इतर त्यांच्या घरासमोर पिंपळगाव कौडा येथे उभे असताना तेथे किरण गवळी व इतर आले. त्यांच्या हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड, लोखंडी कत्ती, लोखंडी फुकणी, लाकडी फळी होती. यांना सगळ्यांना आज संपवुन टाकु, यांची रोजची कटकट मिटुन टाकू असे म्हणून अजय गवळी व इतरांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तुम्ही जर पोलिसांत तक्रार दिली तर तुम्हाला कायमचे संपवू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...