spot_img
ब्रेकिंगथंडीत उन्हाचा चटका!; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक तापमान?

थंडीत उन्हाचा चटका!; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक तापमान?

spot_img

Maharashtra Weather: गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असल्याचे चित्र आहे, तर दिवस जसा सरेल तसा उष्माचा पारा वाढताना दिसत आहे. यामुळे पहाटे काहीशी थंडी तर दुपारी कडक उन्ह अशी एकूण परिस्थिती झाली आहे. राज्यातील कमाल तापमााचा पारा ३६ अंशापार पोहोचला आहे. सोमवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी हरियाणाच्या रोहतक भागात देशाच्या सपाट भूभागावर निचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाडमधील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचं दिसून आलं. तर उर्वरित राज्यात किमान तापमान १० ते २२ अंशाच्या दरम्यान होते.

राज्याच्या कमाल तपामानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत सोलापूरसहित मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सांगली, परभणी, विदर्भातील ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, चंद्रपूर , वर्धा या भागात कमाल तापमान ३६ अंशावर होतं.

राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत. उकाड्यामुळे नागरिकांच्या घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज कमाल आणि किमान तापमानात १ ते २ अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीये. तापमानातील बदलामुळे लोकांमध्ये आजार बळावण्याची शक्यता

राज्यात कुठे किती होते तापमान?
जेऊर (३६.५-१४.५), कोल्हापूर (३४.६-१९.५), महाबळेश्वर (३१.२-१७.१), पुणे (३५.८-१२.९), अहिल्यानगर (३५.०-११.६), धुळे (३५.०-११.०), जळगाव (३४.७-१४.२), मालेगाव (३३.२-१३.८), नाशिक (३४.१-१३.६), निफाड (३२.४-८.०), अकोला (३६.७-१७.३), सांगली (३६.३-१८.०), सातारा (३५.२-१५.२), सोलापूर (३७.४-१८.६),  अमरावती (३५.८-१५.३), नागपूर (३६.५-१५.०), वर्धा (३६.०-१५.८), सांताक्रूझ (३५.९-१८.५), डहाणू (३३.२-१७.५),रत्नागिरी (३५.९-१८.५), छत्रपती संभाजीनगर (३५.०-१६.६), धाराशिव (३४.६-१५.६), परभणी (३६.५-१७.१), वाशीम (३३.४-२१.६), यवतमाळ (३५.४-१६.०), भंडारा (३४.८-१६.४), बुलडाणा (३५.०-१६.८)ब्रह्मपुरी (३७.२-१५.५), चंद्रपूर (३६.४-१६.०), गडचिरोली (३४.६-१६.०), गोंदिया (३४.४-१५.४)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात राजकीय धुळवड! नाना पटोलेंची अजित पवार, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर

मुंबई । नगर सहयाद्री:- देशात सगळीकडे होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यातच...

गाळे भाडे वसुलीसाठी मनपाचा ऍक्शन प्लॅन; विशेष ‘स्क्वॉड’ मैदानात, आयुक्त म्हणाले आता…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : महापालिकेच्या करसंकलन विभागासाठी गाळे भाडे थकबाकी मोठी डोकेदुखी ठरत आहे....

दूध उत्पादकांना खुशखबर; दरात दोन रुपयांनी वाढ; कधीपासून पहा..

मुंबई / नगर सह्याद्री : उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी...

नगरमध्ये तलवारीने सपासप वार; दोन गटात ‘या’ ठिकाणी राडा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शहरातील घासगल्ली येथे दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत...