अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातील कोपरगाव शहरामधील संजयनगर, आयशा कॉलनीत घरामध्ये सुरु असलेल्या ५ अवैध कत्तलखान्यावर प्रशासनाचने जमीनदोस्त मोठ्या पोलिस बंदोबस्तात जेसीबी फिरविला. यावेळी जवळपास पाच अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले. संबंधित जागा मालकांना नोटिसा बजावूनही त्यांनी अनधिकृत शेड काढून न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी: अवैध कत्तलखान्यांबाबत शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी अवैध कत्तलखाने हटविण्याची मागणी करत गुन्हा दाखल केला होता. त्यानुषंगाने संबंधीत जागा मालकांना २४ तासांत अनधिकृत कत्तलखाने हटविण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यांनी ती अनधिकृत बांधकामे काढून घेतली नाहीत, म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली.
गुरुवारी सकाळी अकरा वाजता नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यांवर जेसीबी चालविला. यावेळी बैल बाजार रोड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोहिमेत नगरपालिकेच्या टाऊन प्लॅनिंग विभागाची टीम, बांधकाम विभागाचे पथक तसेच शीघ्र कृती दलाची तुकडी, शहर व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.