राहाता । नगर सहयाद्री
राज्यात बंदी असलेल्या गोमांसवर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालास पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन हजार ३०० किलो गोमांस जप्त केले असून ५० गोवंशीय जनावराची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करुन गोमांस वाहतुक व विक्री करणा-या इसमांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोउपनि/ तुषार धाकराव, अंमलदार मनोहर गोसावी, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, राहुल सोळुंके, संदीप दरंदले, संतोष खैरे, भिमराज खर्से, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाला गोमांस वाहतुक व विक्री करणारे इसमांची माहिती घेवुन कारवाई करण्याच्या सुचना केल्या.
पथकाला राहाता तालुक्यातील ममदापुर गावात एका इसमाने राहत्या घराजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीची काही जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने शेडमध्ये डांबुन ठेवल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर ठिकाणी छापा छापा टाकला असता पत्र्याच्या शेडमध्ये ८ इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करतांना दिसुन आले. पथकाची चाहूल लागताच काहिंनी धूक ठाकली. पथकाने पाठलाग गरुन इरफान शेरखान पठाण, अनिस नुरा पठाण, जावेद नाजु शेख, (रा. ममदापुर, ता. राहाता) यांना ताब्यात घेतले. तर अदिल सादिक कुरेशी, नाजीम आयुब कुरेशी, वसीम हनीफ कुरेशी, आरिफ अमीर कुरेशी, शोएब बुडन कुरेशी सर्व (रा. ममदापुर, ता. राहाता) हे फरार झाले.
कत्तलीसाठी आणलेली जनावरे ही अल्ताफ जलाल शेख याचे घराचे लगत अलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेले असल्याचे सांगुन तो तसेच सुरेश लक्ष्मण खरात व मुम्तजील मुनीर कुरेशी हे कत्तलीसाठी जनावरे आणुन देतात असे सांगितले. पथकाने अल्ताफ जलाल शेख यांच्या घराचे मागील बाजुस असलेल्या पत्र्याचे शेडची पाहणी करत सुरेश लक्ष्मण खरात, अल्ताफ जलाल शेख यास ताब्यात घेतले. यावेळी शोएब बुडन कुरेशी फरार झाला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून १२ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.