spot_img
ब्रेकिंगलोकसभेपूर्वी ठाकरे गटाला धक्का..? सलग २५ वर्षे आमदार राहिलेले माजी मंत्री सोडणार...

लोकसभेपूर्वी ठाकरे गटाला धक्का..? सलग २५ वर्षे आमदार राहिलेले माजी मंत्री सोडणार साथ

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सगळीकडे सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप आणि हेवे दावे करण्यात येत आहेत. त्यातच आता लोकसभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का बसणार आहे.

अनेक विश्वासू लोकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अता नाशिकमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप आज ६ एप्रिल रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बबनराव घोलप यांनी पाच वेळेस देवळाली मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर, युती सरकारच्या काळात ते मंत्री होते.

शिर्डीच्या उमेदवारीत डावल्याने बबनराव घोलप नाराज होते. यामुळे आज ते शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून बबनराव घोलप यांचा आज संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...