मुंबई। नगर सह्याद्री-
लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू असताना राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (५५) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी शैलेश जैन यांनी वैभव ठक्करला हिशोबासाठी कार्यालयात बोलावलं होतं.
यावेळी अविनाश जाधव यांनी त्यांच्या सहकार्यासह जैन यांचा मुलगा स्वामिल याला मारहाण केली. तसंच अविनाश जाधव यांनी तक्रारदार शैलेश जैन यांना उचलून नेण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.