नांदेड। नगर सहयाद्री-
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टच वक्तव्य केले आहे.
काही महिन्यामध्ये राज्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दाैरावर आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी संवाद साधला.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना व विकास कामे थेट जनतेपर्यंत पोहचत आहे. आम्ही पक्ष फोडायला जाता नाही, पण भाजपचा दुपट्टा घालण्यास कोणी तयार असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात येण्यास इच्छुक असल्याची हे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.