spot_img
अहमदनगरअहिल्यानगरमध्ये भाजपाला धक्का? बडा नेता आ. रोहित पवार यांच्या सोबत...

अहिल्यानगरमध्ये भाजपाला धक्का? बडा नेता आ. रोहित पवार यांच्या सोबत…

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रा राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुक्यातील नेते राजेंद्र देशमुख यांनी हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

यावेळी पोपटराव खोसे, दादासाहेब कानगुडे बाबासाहेब मोरे औदुंबर निंबाळकर भरत पावणे गणेश पांडुळे अंकुश गावडे शिवाजी खराडे वसंत अनबुले डॉक्टर विलास कवळे भाऊसाहेब शिंदे नीलम ताई साळवे शिवदास शेटे भीमराव शिंदे रवी पाटील डॉ. प्रकाश भंडारी यांच्यासह पाच हजार नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता असलेले राजेंद्र देशमुख यांनी राशीन येथे समर्थकांचा मेळावा घेतला. व या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करून आमदार रोहित पवार यांच्या सोबत काम करण्याचे जाहीर केले. त्यांनी ही घोषणा करतात हजारो समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी व टाळ्या वाजवून स्वागत केले.

कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. आमदार राम शिंदे उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आणि नेमके त्याच्या आदल्या दिवशी रोहित पवार यांनी राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या पक्षाचा बडा नेता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार गटात घेतला आहे. यामुळे याचा मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे.

पूर्वाश्रेमीचे काँग्रेस नेते राजेंद्र देशमुख यांचे आजोबा व वडील हे जुने काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील बडे नेते म्हणून ओळखले जातात. कर्जत तालुक्यातील जगदंबा सहकारी साखर कारखाना उभारणीमध्ये दिवंगत नेते बापूसाहेब देशमुख यांनी मोलाचे योगदान दिले होते. सन 2009 विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या काही मतांनी बापूसाहेब देशमुख यांचा पराभव झाला होता.

यानंतर सन 2014 ला राजेंद्र देशमुख यांनी काँग्रेस पक्ष सोडून आमदार राम शिंदे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून त्यांना विजय करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांनी राम शिंदे यांचे व भाजपचे काम केले होते. मात्र आमदार राम शिंदे यांनी व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कधीही निवडणुकीनंतर देशमुख यांना कोणत्याही कामाच्या संदर्भात विश्वासात घेतले नाही.

यामुळे भारतीय जनता पक्षात सातत्याने डावलले जात असल्यामुळे अखेर विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात त्यांनी राम शिंदे व भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये आमदार रोहित पवार यांचे मुसिद्धी राजकारण कामी आले. आमदार राम शिंदे यांनी अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील लहान मोठे नेते भाजप सोबत घेतले मात्र रोहित पवार यांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये भाजपचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेऊन मोठा शहर कर्जत जामखेड मतदार संघात भाजपला दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य; ‘या’ पाच राशींना मिळणार खुशखबर, तुमची रास काय?, वाचा..

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील -...

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...