spot_img
अहमदनगरअहमदनगर: 'आयन' चे भयंकर कृत्य!! दहावीच्या मुलीच्या डोक्याला लावली पिस्तुल आणि...पुढे घडलं...

अहमदनगर: ‘आयन’ चे भयंकर कृत्य!! दहावीच्या मुलीच्या डोक्याला लावली पिस्तुल आणि…पुढे घडलं असं काही?

spot_img

श्रीगोंदा। नगर सहयाद्री
डोक्याला पिस्तुल लावून गुन्हा केल्याच्या घटना आपण चित्रपटांमध्ये पाहत असतो. मात्र, असाच फिल्मी थरार अहमदनगर मधील श्रीगोंद्याच्या बेलवंडीत घडला. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला एका तरुणाने पिस्तुलाचा धाक दाखवत पळवून नेत पुण्यात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडाला आहे. आयन इम्तियाज शेख (१९) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी: पीडित अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी मामाकडे राहत होती. मामाच्या गावावरून पेपरसाठी ती दहावीच्या पेपरसाठी बेलवंडी येथील विद्यालयात आली होती. २६ मार्च रोजी बेलवंडीत या तरुणाने मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

नंतर बळजबरीने दुचाकीवर बसवत पुणे येथे नेले. पुण्यातील एका लॉजवर रात्री त्याने तिच्यावर अत्याचार केला. २८ मार्च रोजी हे दोघे नारायणगाव (ता. जुन्नर, पुणे) येथील मुलाच्या आजीच्या घरी गेले. मुलाच्या आजीने दोघांना बेलवंडी पोलिस ठाण्यात हजर केले.

पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर घडलेले प्रकरण उजेडात आले. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पवारांनी मोदींच्या सभांचा स्ट्राईक रेटच काढला ; म्हणाले..

मुंबई: नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात 18 सभा आणि एक रोड...

Nagar Arban Bank News : नगर अर्बन बँक घोटाळ्यात मोठी अपडेट; ‘त्या’ अधिकाऱ्याच्या खात्यात मोठे घबाड

अहमदनगर | नगर सह्याद्री Nagar Arban Bank News : येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या...

विधानसभेसाठी इंडिया आघाडीची जय्यत तयारी; उद्धव ठाकरे यांनी उघडला पत्ता

मुंबई : नगर सह्याद्री भाजपला हरवू शकतो हे महाविकास आघाडीने राज्यात दाखवून दिले. महाविकास आघाडीत...

Radhakrishna Vikhe Patil : पशुपालकांना खुशखबर; शासनाने घेतला मोठा निर्णय, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा..

राहाता | नगर सह्याद्री Radhakrishna Vikhe Patil : राज्यातील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले...