spot_img
अहमदनगरअहमदनगर: 'आयन' चे भयंकर कृत्य!! दहावीच्या मुलीच्या डोक्याला लावली पिस्तुल आणि...पुढे घडलं...

अहमदनगर: ‘आयन’ चे भयंकर कृत्य!! दहावीच्या मुलीच्या डोक्याला लावली पिस्तुल आणि…पुढे घडलं असं काही?

spot_img

श्रीगोंदा। नगर सहयाद्री
डोक्याला पिस्तुल लावून गुन्हा केल्याच्या घटना आपण चित्रपटांमध्ये पाहत असतो. मात्र, असाच फिल्मी थरार अहमदनगर मधील श्रीगोंद्याच्या बेलवंडीत घडला. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला एका तरुणाने पिस्तुलाचा धाक दाखवत पळवून नेत पुण्यात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडाला आहे. आयन इम्तियाज शेख (१९) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अधिक माहिती अशी: पीडित अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी मामाकडे राहत होती. मामाच्या गावावरून पेपरसाठी ती दहावीच्या पेपरसाठी बेलवंडी येथील विद्यालयात आली होती. २६ मार्च रोजी बेलवंडीत या तरुणाने मुलीला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

नंतर बळजबरीने दुचाकीवर बसवत पुणे येथे नेले. पुण्यातील एका लॉजवर रात्री त्याने तिच्यावर अत्याचार केला. २८ मार्च रोजी हे दोघे नारायणगाव (ता. जुन्नर, पुणे) येथील मुलाच्या आजीच्या घरी गेले. मुलाच्या आजीने दोघांना बेलवंडी पोलिस ठाण्यात हजर केले.

पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर घडलेले प्रकरण उजेडात आले. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...