राहुरी । नगर सहयाद्री:-
राहुरी तालुक्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. याबाबत राही पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यात तिच्या कुटुंबासह राहते. २८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजे सुमारास मुलगी व घरातील इतर लोक जेवण करुन एका खोलीमध्ये झोपी गेले होते. २९ नोव्हेंबर रोजी पहाटे एक वाजे दरम्यान मुलीच्या वडिलांना जाग आली. तेव्हा मुलगी घरातून गायब झाल्याचे लक्षात आले. नातेवाईकांनी आजुबाजुच्या परीसरात, नातेवाईकांकडे शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही.
अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी, कशाचे तरी आमिष दाखवून मुलीला फूस लावून पळवून नेले, अशी नातेवाईकांची खात्री झाली. याबाबत राहूरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.