spot_img
अहमदनगरकर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन...

कर्ज मिटविण्यासाठी उच्च शिक्षित तरुणाने लढवली शक्कल? पण एक चूक नडली, आन कारागृहाची वारी घडली..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
शेअर मार्केटमुळे झालेले कर्ज मिटविण्यासाठी एका उच्च शिक्षित तरुणाने भरदिवसा बंद फ्लॅट फोडून राज्यभर चोर्‍या केल्याची घटना समोर आली आहे. या आरोपीला कोतवाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रज्वल गणेश वानखेडे ( रा. टी.व्ही. सेन्टर, हडको, श्रीकृष्णनगर जि. छत्रपती संभाजीनगर ) असे आरोपीचे नाव आहे.

शहरातील केडगाव परिसरातील पार्थ हाईटस व साई गॅलेक्सी अपार्टमेन्ट मध्ये घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम रक्कम भरदिवसा चोरुन नेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून कोतवाली गुन्हेशोध पथक हे सदर आरोपीच्या मागावर होते.

तपासादरम्यान गुन्हेशोध पथकाला दोन्ही गुन्हे आरोपी प्रज्वल वानखेडेने केले असल्याचे निष्पन्न झाले,मात्र आरोपी उच्च शिक्षित असल्याने तो फोन चा वापर तांत्रिक रित्या करत राहण्याचा ठाव ठिकाणा बदलत असल्याने त्याला ताब्यात घेणे कठीण होते. दरम्यान कोतवाली गुन्हे शोध पथकास आरोपी प्रज्वल गणेश वानखेडे छत्रपती संभाजी नगर येथील चितेगाव एम.आय.डी.सी येथे असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे मिळाली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ चितेगाव येथे जावुन मोठ्या शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले.

पथम आरोपीकडे चौकशी केली असता त्यांने उडवाउडविची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी करता त्यांनी सदरचे गुन्हे शेअर मार्केटमध्ये पैसे हरल्याने कर्ज बाजारी झाल्याने कर्ज मिटविण्यासाठी केले असल्याची कबुली दिली. आरोपीकडून ३ लाख ९८ हजार ५०० रुपये किंमतीचा सोन्याचा मुददेमाल व एक दुचाकी असा एकुण ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि योगिता कोकाटे, विकास काळे, पोसई कृष्णकुमार सेदवाड व गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, विशाल दळवी, सलीम शेख, संदिप पितळे, विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, मोहन भेटे, नकुल टिपरे, विजय काळे, पोकॉ/अभय कदम, अमोल गाढे, सतिष शिंदे, अतुल काजळे, राम हंडाळ, संदिप थोरात, मपोना/ वर्षा पंडीत, मपोकाँ / सोनल भागवत दक्षिण मोबाईल सेलचे पोकाँ /राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

इंजेक्शन जीवावर बेतलं, दोन चिमुरड्यांचा मृत्यू!; ‘या’ हॉस्पिटलमध्ये घडला प्रकार

Butox Injection Death: एका हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...

राष्ट्रवादीची ताकद वाढणार; ‘या’ ४ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार?

Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हं आहेत. जिल्ह्यातील चार माजी आमदार...

अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; महिलेच्या बंगल्यावर दरोडा

अकोले | नगर सह्याद्री अकोले शहरातील परवानाधारक देशी दारू विक्रेत्या काशीबाई म्हतारबा डोंगरे (रा.देवठाण रोड...

‘मळगंगा देवीच्या घागर दर्शनासाठी लोटला जनसागर’

निघोज | नगर सह्याद्री राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता....