हिंगोली। नगर सहयाद्री
हिंगोली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. डिग्रस शिवारामध्ये घडलेल्या घटनेत आई-वडिलांसह मुलाचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव असे मयत व्यक्तींचे नाव आहेत.
आकाश जाधव हे काल सायंकाळच्या सुमारास आपल्या आई-वडीलांना रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, डिग्रस वाणी गावाच्या शिवारात असलेल्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळली. या अपघातामध्ये आकाश जाधव यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंबियांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असूनघटनेमुळे संपूर्ण वाणी गावावर शोककळा पसरली आहे.