spot_img
आर्थिकसर्वसामान्यांना सरकाच गिफ्ट! गॅस सिलिंडर झाला स्वस्त; पहा नवी किंमत?

सर्वसामान्यांना सरकाच गिफ्ट! गॅस सिलिंडर झाला स्वस्त; पहा नवी किंमत?

spot_img

LPG Cylinder Price: केंद्र सरकारने जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. एलपीजी सिलिंडर जवळपास ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे आणि नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवीन दर जारी केले जातात. जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी, १९ किलो वजनाचा व्यावसायिक सिलिंडर ३० ते ३१ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १५९८ रुपये आहे. दिल्लीत १६४६ रुपये, चेन्नईमध्ये १८०९.५० रुपये, आणि कोलकातामध्ये १७५६ रुपये इतकी झाली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग चौथ्या महिन्यात घट झाली आहे. या कालावधीत चारही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर १५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ९ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत.

मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत सर्वात कमी ८०२.५० रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने गेल्या १० महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास ३०० रुपयांनी कपात केली आहे. आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल अपेक्षित नाही, परंतु व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...