spot_img
अहमदनगरAhmednagar Today: बनावट कॉल आला आणि साडेतीन लाख घेऊन गेला! 'असा' घडला...

Ahmednagar Today: बनावट कॉल आला आणि साडेतीन लाख घेऊन गेला! ‘असा’ घडला प्रकार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट बँक खात्यावर जमा करण्यासाठी आलेल्या बनावट कॉलला प्रतिसाद दिल्याने महिलेच्या बँक खात्यातील तीन लाख २९ हजार ८०० रूपये काढून घेतल्याची घटना समोर आली. याप्रकरणी नगर-कल्याण रस्त्यावरील ड्रिम सिटी परिसरातील महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांचे ऍसीस बँकेच्या चितळे रस्त्यावरील शाखेत खाते आहे. त्या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरतात. मंगळवारी (दि. २६) दुपारी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून त्यांना फोन आला. त्या व्यक्तीने ऍसीस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट तुमच्या खात्यावर जमा होतील, अशी बातावणी करत मोबाईलवर पाठविलेला ओटीपी मागितला असता फिर्यादीने त्याला ओटीपी सांगितला. त्या व्यक्तीने फिर्यादीच्या व्हॉट्सअ‍ॅपला एक लिंक पाठविली व त्यावरून ऍसीस बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर फोन बंद झाला. फिर्यादीने त्यावर पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही.

काही वेळाने फिर्यादीच्या मोबाईलवर बँक खात्यातील पैसे डेबिट झाल्याचे मेसेज आले. एकुण तीन लाख २९ हजार ८०० रूपये त्या व्यक्तीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीने पतीसह ऍसीस बँकेच्या शाखेत धाव घेतली. तेथे चौकशी केली असता असा कोणताही फोन आम्ही केला नसल्याची माहिती बँकेतून देण्यात आली. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली.

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

फूटपाथवर झोपलेल्या तीन जणांचे डोळे पुन्हा उघडलेच नाही?; भरधाव डंपरने चिरडलं!

Accident News: रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने फूटपाथवर...

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला; कारण काय?

Allu Arjun: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घराबाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या ज्वाइंट अॅक्शन कमिटीच्या सदस्यांनी रविवारी...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी कधी मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत...

आजचे राशी भविष्य! कुठल्या राशींसाठी आजचा दिवस लाभदायक? वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणीत रंगून जाल....