Rain update: राज्याच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे. सकाळी आणि रात्री गुलाबी थंडी तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. दरम्यान,आजही राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
यामुळे राज्यात कमी गारठा जाणवणार असल्याचा अंदाज असून पुढील काही दिवसात राज्यात तापमानात आणखी बदल होऊन नववर्षांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभगाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. पहाटे आणि रात्री कमालीची थंडी तर दुपारी उकाडा असे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
राज्यातील मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणातही तापमानाचा पारा घसरला असून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.