spot_img
अहमदनगरकपड्याचे दुकान फोडून पावणे सहा लाखांचा ऐवज चोरीला

कपड्याचे दुकान फोडून पावणे सहा लाखांचा ऐवज चोरीला

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

शहरासह उपनगरात चोर्‍या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. केडगाव उपनगरात कपड्याचे दुकान फोडून पावणे सहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच माणिकनगर येथील व्यावसायिक कुटुंब पर्यटनासाठी गेले असता त्यांचे घर फोडून साडेदहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोकड असा तीन लाख ८० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी व्यावसायिक निखील संजय मुनोत (वय ३४ रा. पत्रकार वसाहत, माणिकनगर, आनंदऋषी हॉस्पिटल जवळ, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील मुनोत हे कुटुंबासह २ नोव्हेंबरला रात्री ११ वाजता घर बंद करून राजस्थान येथे देवदर्शन व पर्यटनासाठी गेले होते. जाताना त्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम ही घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवून लॉकर लॉक केले होते. दरम्यान, ते शनिवारी (९ नोव्हेंबर) सकाळी सव्वा सातच्या सुमारास घरी आले. त्यांनी कुलूप उघडून आत प्रवेश केला असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला व दरवाजा उघडा दिसल्याने घरात चोरी झाली असल्याची त्यांची खात्री झाली. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांना दिसून आली नाही. त्यांनी घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना दिली.

घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे व अंमलदार यांच्यासह फिंगरफ्रिंट व डॉगस्कॉड पथक यांनी भेट दिली.

मुनोत यांच्या घरातून ६५ हजाराची रोकड, सहा तोळ्याच्या सहा बांगड्या, दीड तोळ्याच्या आठ अंगठ्या, दीड तोळ्याचे मनीमंगळसूत्र, दीड तोळ्याचा सोन्याचा हार असा एकुण तीन लाख ८० हजाराचा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुगडे करत आहेत.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...