spot_img
अहमदनगरलोढा, चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा..? हिंद सेवा मंडळाच्या पत्रकार परिषदेत घडलं असं...

लोढा, चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा..? हिंद सेवा मंडळाच्या पत्रकार परिषदेत घडलं असं काही…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
वसंत लोढा, दीप चव्हाण आदींनी हिंदसेवा मंडळाच्या विश्वस्तांवर आरोप केले होते. हे सर्व आरोप विश्वस्त अनंत रामचंद्र फडणीस यांनी फेटाळून लावले आहेत. लोढा, चव्हाण यांनी जे आरोप केले आहेत त्यावरून आम्ही त्यांच्यावर प्रत्येकी ५० लाखांचा अब्रुनुकसानीचा दावा टाकणार असल्याचे फडणीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हिंद सेवा मंडळाच्या ताब्यातील मनमाड रोड लगत असणारी जमीन संगनमताने, कटकारस्थान रचत अवघ्या २५ कोटी रुपयात ताबा सोडण्याबाबत बेकायदा ठराव करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषद घेत वसंत लोढा, दीप चव्हाण, संजय घुले यांनी केला होता.

परंतु आता याला विश्वस्त अनंत रामचंद्र फडणीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिउत्तर देत केलेले हे आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष ऍडव्होकेट अनंत फडणीस, कार्यकारणी सदस्य सुमतीलाल कोठारी, ज्योती कुलकर्णी, जगदीश झालानी, रणजीत श्रीगोड, बी यु कुलकर्णी आदी उपस्थित होते.

फडणीस म्हणाले, हिंद सेवा मंडळाच्या ताब्यातील ही जागा वफ बोर्डाची असल्याचे लोढा, चव्हाण हे सांगत आहेत. परंतु १९९५ आधीच या जागेवरून त्यांचा अधिकार काढलेला आहे. त्यामुळे ही जागा वफ बोर्डाची आहे असे म्हणण्यामागे नेमका कोणता उद्देश लोढा यांचा आहे हे समजण्यास तयार नाही असे फडणीस म्हणाले. तसेच लोढा, चव्हाण हे वफ बोर्डाचे एजंट आहेत आहेत का अशी शंका यायला लागली असल्याचे ते म्हणाले.

‘या’जागेवर ताबेमारी ती सोडवा
अनंत फडणीस यावेळी म्हणाले, की लोढा यांनी हिंद सेवाच्या जागेवर ताबेमारी सुरु असल्याचा दावा केला. परंतु या जागेवर कोणतीही ताबेमारी नाही. ताबेमारीचा विषय घेतलाच तर हिंद सेवाच्या चार जागा कँटीन, रामकरणं सारडा, वस्तूसंग्रहालयाशेजारील जागा व केडगाव येथील जागेवर अतिक्रमण करत ताबेमारी झाली आहे. आम्ही लोढा यांना अधिकार पत्र देण्यास तयार आहोत त्यांनी ही ताबेमारी खाली करावी असे आवाहन फडणीस यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर! ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई | नगर सहयाद्री राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याचे संकेत हवामान विभागाने दिले...

मंत्री विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; काय झाली चर्चा?

लोणी । नगर सहयाद्री :- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून...

‘आदर्श’ चालवायचा वेश्यावसाय; अहिल्यानगरमध्ये पोलिसांचा छापा..

Ahilyanagar Crime News: शहरातील एका लॉजवर अनाधिकृत वेश्याव्यवसाय करणार्‍या रँकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला....

आजचे राशी भविष्य; या राशीच्या लोकांच्या घरात आज येणार पाहुणे, आनंदी वातावरण की ताण वाढणार?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी...