spot_img
ब्रेकिंगIND vs SA, Final: एक कॅच अन विजयाची मैच! टीम इंडियासाठी 'हा'...

IND vs SA, Final: एक कॅच अन विजयाची मैच! टीम इंडियासाठी ‘हा’ ठरला टर्निंग पॉईंट

spot_img

IND vs SA, Final: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विजय मिळवला आहे. यासह २००७ नंतर दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादवने टिपलेली कॅच भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट ठरली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली. १८ व्या षटकापर्यंत दोन्ही संघांना विजयाची संधी होती. कारण डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. मात्र त्यावेळीच असं काही घडलं ज्याचा कोणीच विचार केला नव्हता.

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करण्याची जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पहिलाच चेंडू हार्दिकने फुल टॉस टाकला. ज्यावर डेव्हिड मिलरने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. मात्र त्यावेळी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या सूर्यकुमार यादवने उडी मारत झेल टिपला. त्याने सीमारेषेच्या बाहेर जात असलेला चेंडू आत फेकला आणि हा झेल टिपला.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आणि संघाची धावसंख्या १७६ धावांवर पोहचवली. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना गुड न्यूज! जूनचा हप्ता जमा होणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख

मुंबई। नगर सहयाद्री:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या...

राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र; राज्याचे लक्ष ‘विजयी मेळावा’ कडे

मुंबई । नगर सहयाद्री :- राज्यात त्रिभाषा सूत्राविरोधात निर्माण झालेल्या वातावरणानंतर आज मुंबईत वरळी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या ग्रहांनी दिशा बदलली, कुणाच्या कुंडलीत काय? पहा एका क्लिकवर..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा...

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...