Baba Ramdev: उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. प्रसिद्ध असणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजलीला मोठा झटका बसला आहे. पतंजलीच्या कंपनीच्या तब्बल १४ औषध विक्रीला ब्रेक लावण्यात आला तसेच औषधांचा परवाना देखील सरकारने रद्द केला आहे.
योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फटकारले आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
सुनावणी वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय आहे की, पतंजली आयुर्वेदाच्या उत्पादनांबाबत वारंवार दिशाभूल करणारी जाहिराती प्रसिद्ध केल्यामुळे आम्ही कंपनीच्या १४ औषधांवर बंदी घातली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पावर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे. इतकंच नाही, तर या औषधांचा परवाना देखील सरकारने रद्द केला आहे.