spot_img
राजकारणकाका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

spot_img

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथील पक्षाच्या राज्यव्यापी शिबिरात केलेल्या भाषणात अनेक राजकीय खळबळ उडवून देणारी वक्तव्ये केली.

आपल्या भाषणातून त्यांनी शरद पवार गटातील इतर नेत्यांवरही हल्ला चढवला आहे. अजित पवार यांनी पहिल्यांदाच आपल्या पुतण्यावर, शरद पवार गटनेते रोहित पवार यांच्यावर जाहीर भाष्य केले आहे. काही लोक गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत, असं ते म्हणाले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यातून सुरू झालेली रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपुरात दाखल होणार आहे. या यात्रेवरून रोहित पवारांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, ‘काही लोक आता गुडघ्याला बाशिंग बांधून संघर्ष यात्रा काढत आहेत. अरे संघर्ष कसला ? आयुष्यात कधी संघर्ष केला नाही आणि आता कोणता संघर्ष?’, असा खोचक सवाल करत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.

यावेळी जितेंद्र आव्हाडांनाही त्यांनी डिवचलं. “मागे एकदा आमचे वरिष्ठ पावसात भिजले होते, तसं आता त्यांचा एक सहकारीही पावसात भिजला, अरे कशासाठी? त्याच्यावर एकदा हल्ला झाला होता, तेव्हा मीच आधार द्यायला गेलो होतो. मी सगळ्यांच्या पाठीशी उभा राहिलो, कारण आपल्यात तशी हिंमत आहे,” असं अजित पवार म्हणाले.

पक्षवाढीसाठी काम करणार
पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. यापुढे आठवड्यातील सात दिवसांपैकी तीन दिवस मुंबईला, एक दिवस पुण्याला आणि उरलेले तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे. विकासासाठी मला ही अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. अशी कामे प्रदेशाध्यक्षांना, सर्व सेलप्रमुखांना करावी लागतील आणि आमच्या मंत्र्यांनाही करावी लागतील. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे लागतील.

लोकसभेला भाजप २६ जागा लढवणार आहे. पण तुम्ही त्याबाबतची काळजी करू नका. जी काही आपली ताकद आहे, त्यानुसार आपल्याला व्यवस्थित जागा मिळतील असं अजित पवार यांनी सांगितलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...

ग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शकीला पठाण...