spot_img
अहमदनगरहिवरे बाजारच्या ग्रामस्थसभेत मोठा निर्णय! लोकसभा निवडणूकीत 'ती' परंपरा गावकरी जपणार

हिवरे बाजारच्या ग्रामस्थसभेत मोठा निर्णय! लोकसभा निवडणूकीत ‘ती’ परंपरा गावकरी जपणार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणूकीची धामधूम सध्या सुरू असून पारनेर-नगर मतदारसंघातील हिवरेबाजार या निवडणूकीतही आपल्या गावाची परंपरा जपणार आहे. या गावात कोणालाही मतदानाची सक्ती केली जात नसून कोणत्याही पक्षाचा पोलिंग एजंट न देता गावकरीच उमेदवाराच्या सल्ल्याने पोलिंग एजंटची नियुक्ती करतात.

हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने विविध राजकीय पक्षांना आवाहन करण्यात आले असून कोणत्याही मतदाराला मतदानाची सक्ती करण्यात येणार नसून परंपरेप्रमाणे मतदानाच्या वेळी गावकरीच पोलिंग एजंट देणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने आयोजित ग्रामस्थ सभेमध्ये घेण्यात आला.

त्याचबरोबर मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असून आदर्श आचार संहितेचे पालन काटेकोरपणे करण्यात येणार असल्याचीही माहिती ग्रामस्थसभे मध्ये देण्यात आली. हिवरे बाजार ग्रामस्थांच्या प्रामाणिक प्रयत्नातून तसेच गावाला प्रामणिकपणे सहकार्य करणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते, प्रशासन, पत्रकार यांच्यामुळे हिवरे बाजार पाहण्यासाठी दररोज राज्यातून, देशातून मोठया प्रमाणावर अभ्यास सहली येतात. त्यामुळे हिवरे बाजार हे ग्रामविकासाचे प्रेरणास्थान झाले आहे.

सन १९९० सालापासून प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकांना सर्व ग्रामस्थ एकत्र बसून कुठलीही सक्ती न करता कोणाच्याही अमिषाला बळी न पडता ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घडवून आणत आहेत. पूर्वी सर्व मतदानाची एकत्रीत मोजणी होत होती, त्यामुळे कोणताही उमेदवार नाराज होत नव्हता.

जेंव्हापासून बुथनिहाय मतदान मोजले जाऊ लागले तेंव्हापासून प्रत्येक उमेदवारास कोणत्या गावात किती मतदान झाले हे समजू लागले. तरीही कोणत्याही उमेदवाराने, लोकप्रतिनिधीनी यांनी नाराजी व्यक्त केली नाही. प्रत्यक्ष उमेदवार जर हिवरे बाजार भेटीला आले तर ग्रामस्थ त्यांना श्रीफळ देऊन स्वागत करत आसतात.

इतरांना प्रेरणा देणारे हिवरे बाजार
इतरांना प्रेरणा देणारे हिवरे बाजार गाव कायमस्वरूपी राहिले पाहिजे. गेल्या ३५ वर्षानंतर प्रथमच झालेल्या सन २०२१ च्या हिवरे बाजार निवडणूकीतसुध्दा आदर्श आचारसंहितेनुसार याच पद्धतीने निर्णय घेण्यात आला होता. भारतीय लोकशाहीची ताकद म्हणजे निवडणूक प्रक्रिया असून लोकांच्या व गावाच्या समस्या सुटल्या पाहिजेत. हिवरे बाजारच्या विकासात सर्वांनी सहकार्य केलेले आहे. यापूर्वी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या सर्व निवडणूकांमध्ये कधीही पोलिंग एजंट व बुथ यासारखा आग्रह कोणत्याही पक्षाने धरला नाही. यामुळेच हिवरे बाजारचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे.– पद्मश्री पोपटराव पवार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...