नगर सहयाद्री वेब टीम
भारत आणि इराण यांच्यात सोमवारी व्यापारासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला आहे. नव्या करारामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.
भारत आणि इराण दोन दशकांपासून चाबहारवर काम करत आहेत. इराणमधील चाबहार येथील शहीद बेहेश्ती बंदरासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला. करारासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना भारतातून इराणला गेले होते. करारामध्ये 10 वर्षांसाठी बंदर करारात घेण्यात आले आहे.
पूर्वी भारतातून अफगाणिस्तानात कोणताही माल पाठवायचा असेल तर तो पाकिस्तानमधून जावा लागत होता. मात्र, दोन्ही देशांमधील सीमावादामुळे भारत पाकिस्तानशिवाय दुसरा पर्याय शोधत होता. आता माल पाठवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.
यामध्ये चाबहार बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या बंदराच्या मदतीने भारत इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपशी थेट व्यापार करू शकतो. या बंदरामुळे व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.