spot_img
ब्रेकिंगमहायुतीला मोठा धक्का; आज होणार तिसऱ्या आघाडीची घोषणा..?

महायुतीला मोठा धक्का; आज होणार तिसऱ्या आघाडीची घोषणा..?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री :-
राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने, राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्यात जोरदार बैठका होत असतानाच, महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता आहे.

आज छत्रपती संभाजीनगर येथे बच्चू कडू भव्य मोर्चा काढणार आहेत. या मोर्चातुन बच्चू कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सूचक संकेत दिले आहेत, ज्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या तिसऱ्या आघाडीची चर्चा केली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ते विधानसभेतून माघार घेऊ शकतात. त्यामुळे, बच्चू कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केल्यास, महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीचेही गणित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या दृष्टीने बच्चू कडू काय निर्णय घेणार, हे राज्याच्या राजकीय वातावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...