spot_img
ब्रेकिंग४२ लाखांची रोकड पकडली! नगरमध्ये पैसाच-पैसा? शहरात पुन्हा उडाली खळबळ..

४२ लाखांची रोकड पकडली! नगरमध्ये पैसाच-पैसा? शहरात पुन्हा उडाली खळबळ..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रशासनाला कडक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नगरला 3 लाख 84 हजार रुपयांची रोकड हस्तगत केल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच काल गुरूवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेरात हवाल्याची 42 लाख 15 हजार रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त केली. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात बेहिशोबी मालमत्ता बाळगणार्‍या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणार्‍या इसमांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली, की संगमनेर शहरातील सहदेव ज्वेलर्स येथे भावेश पटेल व आशिष सुभाष वर्मा हे त्यांच्या साथीदारासह आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त रोख रक्कम शासनाचा कर भरणे आवश्यक असताना बेकायदेशीरपणे बाळगून हवालामार्फत विल्हेवाट लावत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यावरून पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार अतुल लोटके, अमृत आढाव तसेच श्रीरामपूर येथील मनोज गोसावी व रमीजराजा अत्तार यांना मिळालेल्या बातमीवरून खात्री करून कारवाई करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. या पथकाने सहदेव ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये जाऊन खात्री केली असता मुकेशकुमार रमेशभाई पटेल (वय 36, रा.पार्श्वनाथ गल्ली, जैन मंदिराजवळ, संगमनेर, मूळ रा. गोठवा, ता. वीसनगर, जि. म्हैसाणा, गुजरात) व धवलकुमार जसवंतभाई पटेल (वय 32, रा. रा.पार्श्वनाथ गल्ली, जैन मंदिराजवळ, संगमनेर, मूळ रा. ठलोटा, ता. वीसनगर, जि. म्हैसाणा, गुजरात) हे पंचासमक्ष त्यांच्या कब्जात असलेल्या रोख रकमेसह मिळून आले.

सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची रक्कम हवाल्याची असल्याचे सांगून मालक भावेश रामाभाई पटेल (रा.पार्श्वनाथ गल्ली, संगमनेर) व आशिष सुभाष वर्मा (रा.अहिल्यानगर) यांची असल्याचे सांगितले. तपास पथकाने अधिक चौकशी केली असता मुकेशकुमार रमेशभाई पटेल व धवलकुमार जसवंतभाई पटेल यांच्याकडे असलेली रक्कम ही त्यांनी कोठूनतरी बेकायदेशीर मार्गाने जमवून शासनाचा कर चुकवून हवाल्यामार्फत विल्हेवाट लावण्याकरीता मिळून आल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष मुकेशकुमार रमेशभाई पटेल यांच्या कब्जामधून 40 लाख 26 हजार रुपये रोख व धवलकुमार जसवंतभाई पटेल याच्या कब्जामधून 1 लाख 89 हजार रुपये रोख अशी एकूण 42 लाख 15 हजार रुपये रोख रक्कम जप्त करून ताब्यात घेण्यात आली आहे. या रकमेबाबत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग; ‘यांनी’ घेतली आदित्य ठाकरे यांची भेट

पारनेर । नगर सहयाद्री विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे....

‘सलमान खानची’ सुपारी घेणाऱ्या ‘सुक्खा कालूयाला’ बेड्या

मुंबई । नगर सहयाद्री:- मुंबई मध्ये १२ ऑक्टोबरला बाबा सिद्धी यांची खेरवाडी येथे गोळ्या झाडून...

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...