spot_img
अहमदनगरMaratha Reservation: मराठा आरक्षणासाठी अहमदनगर बंद!

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी अहमदनगर बंद!

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज जिल्हा बंदची हाक दिली होती. अहमदनगर जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यात व्यापार्‍यांनी दुकान बंद ठेवली होती. मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने मागील तीन दिवसांपासून उपोषण आंदोलन देखील सुरू केलं आहे. आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा बांधवांवर झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे, हैदराबाद गॅझेट , सातारा गॅझेट आणि बॉम्बे गव्हर्मेंट गॅजेट लागू करावं अशी मागणी आंदोलकांने केली आहे.

धनगर समाजाची आक्रमक भूमिका!
धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समजाकडून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या या मागणीसाठी नेवासा तालुयातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल येथे रास्ता रोको करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने धनगर समाज या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालाय. सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाला शरद पवारांचा पाठिंबा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. रत्नागिरीमध्ये शरद पवार एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्यच आहे. त्याशिवाय इतर समाजाचाही विचार व्हावे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.आहे यामुळे एकप्रकारे शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा बँकच असुरक्षीत असेल तर सारंच अवघड!

नोकरभरती मुद्यावर विखेंच्या जोडीने थोरातांचीही चुप्पी बरीच बोलकी | कर्डिलेसाहेब, तडा गेल्यास जोडणं अवघडं...

कोतकरांच्या अर्जावर शंकर राऊत यांचा आक्षेप; पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप, सचिन, अमोल कोतकर यांच्या...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण’ योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख ठरली; कधी होणार जमा? वाचा..

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे...

Sharad Pawar: महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? शरद पवार यांनी दिले १९७७ सालचे उदाहरण! एकदा वाचाच..

Sharad Pawar: राज्यात विधानसभेचे वारे वाहु लागले आहे.महाविकास आघाडीकडून आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यास...