spot_img
अहमदनगरबिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; 'या' परिसरात 'तीन' बिबटे

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री :-
तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख या शेतकऱ्याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये असलेल्या दहा ते बारा शेळ्यांवर सोमवार दि. १६ पहाटेच्या वेळी बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या. काही शेळ्या जखमी झाल्या सात शेळ्यांचा बिबट्यांनी फडशा पाडल्यामुळे हल्ला करण्यामध्ये दोन ते तीन बिबटे असण्याची शक्यता आहे.

बिबट्यांनी शेळ्यांवरती अचानक हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण या भागात अनेक बिबटे असण्याची शक्यता आहे. बिबट्यांचे प्रमाण पठार भागावर आणि पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे कारण अनेक वेळा शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना बिबटे हे दिसून येतात वन विभागाने पाठीमागच्या महिन्यात तीन बिबटे म्हसोबा झाप परिसरामध्ये पकडले.

गारगुंडी येथील आमीन शेख यांच्या शेळ्यांच्या गोठ्या वरच बिबट्याने हल्ला केल्यामुळे सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या यावेळी गावातील ग्रामस्थांनी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांना फोनवरून माहिती दिली यावेळी डॉ. पठारे यांनी घटनास्थळी येत वनविभागाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि त्यानंतर त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येत पंचनामा केला व झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्याचे आश्वासित केले.

सात शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडल्यामुळे गारगुंडी येथील शेतकऱ्याची मोठी हानी झाली आहे तात्काळ त्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी डॉ. श्रीकांत पठारे, गारगुंडी गावचे उपसरपंच प्रशांत झावरे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय फापाळे यांनी केली आहे.

बिबट्यांचा वावर..
टाकळी ढोकेश्वर परिसरात तसेच पठार भागावर आणि तालुक्याच्या उत्तर भागातील म्हसोबा झाप, वारणवाडी, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर दिसून येत आहे वनविभाग तत्पर असून बिबटे पकडण्यात यश मिळाले आहे परंतु तरीही बिबटे परिसरात दिसून येत आहेत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...