अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम सुरु असल्यामुळे पोलीस बंदोबस्तात व्यस्त आहे. आणि यानंतर मंगळावरी विसर्जन मिरवणूकीचा महत्वाचा दिवस असल्याने डोळ्यात तेल घालून पोलिसांना काम करावं लागणार असल्याने आजच पोलिसांनी आपल्या बाप्पाचे विसर्जन केले.
गणेश बाप्पाच्या या मिरवणुकीत पोलिसांनी ठेका धरत मनसोक्त डान्स केल्याचे पाहायला मिळाले. तसेच पोलीस ठाण्यातील सर्वच पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी नाचण्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी पोलिस उप अधिक्षक हरिष खेडकर, रापोनि उमेश परदेशी, पोऊनि विकी जोसेफ, प्रल्हाद चिंचकर, पोहेकॉ नितीन मोरे,दताञय खेडकर ,राजेंद्र कदम,मंगेश काळे,बाबा भोसले, संजय वाघमारे, अजय खंडागळे,संजय डाळिंबकर,कृष्णा वैरागर, पोशि मंगेश दाभाडे, संदीप भोसले,अमोल वारे,सुशील वाघेला, शंकर चोभे, प्रशांत जगधने आदी उपस्थित होते.