spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! भावानेच काढला भावाचा काटा! कुठे घडली घटना पहा...

धक्कादायक! भावानेच काढला भावाचा काटा! कुठे घडली घटना पहा…

spot_img

जळगाव / नगर सह्याद्री –
प्लॉट खरेदी विक्रीच्या कारणावरुन दोन्ही भावांमध्ये वाद सुरु होते. यावरून पुन्हा वाद उफाळून आल्याने मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या भावाच्या डोक्यात बॅटने जोरदार वार केला. यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाला. सदरची घटना वरणगाव फॅक्टरी परिसरात घडली असून घटनेने खळबळ उडाली आहे.

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये सुपरवायझर प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४८) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वरणगाव आयुध निर्माणीच्या वसाहतीत क्वार्टर क्रमांक ४४ टाईप थ्रीमध्ये प्रदीप इंगळे वास्तव्यास होते. वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर होते. दरम्यान ११ सप्टेंबरला ते दुपारी जेवणासाठी घरी आले होते. याच वेळी त्यांचा मोठा भाऊ सतीश इंगळे हा त्यांच्या घरी आला होता. दरम्यान प्लॉट विक्रीवरून दोघांमध्ये काल देखील वाद झाला. यात सतीशने प्रदीप यास मारहाण करण्यास सुरवात केली. यातच सतीशने प्रदीपच्या डोक्यात बॅटने वार केला. यामध्ये प्रदीपचं मृत्यू झाला.

दरम्यान घटना घडल्यानंतर सतीश हा प्रदीपच्या मृतदेहाजवळ बसून होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी, उपनिरीक्षक गांगुर्डे, उपनिरीक्षक सुशील सोनवणे, हवालदार संदीप बनसोडे, सुखराम सावकारे, होमगार्ड राम चौधरी, महेश चौधरी आदींनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सतीशला ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...