अहमदनगर । नगर सहयाद्री:-
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाने दोघा वृध्दावर चाकूने सपासप वार करून हत्या केली तर दुसरा जखमी झाला आहे. भानुदास यादव मिसाळ (वय ७१ रा. सारसनगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे. लहू सुखदेव सानप (वय ६५ रा. शिवाजीनगर, जामखेड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज सकाळी साडेसात वाजता शहरातील नगर शहरातील सारसनगर भागात ही घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोहेकॉ/संदीप घोडके, पोहेकॉ/दीपक शिंदे, पोहेकॉ/रवींद्र टकले यांच्या पथकाने आरोपीला मोठया शीताफिने अवघ्या दोन तासात आरोपीला जेरबंद केले आहे.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून भिंगार कॅम्प पोलीस अधिक तपास करत आहेत.