spot_img
अहमदनगरपरप्रांतीय तरुणाचे भयंकर कृत्य! भर बाजार पेठेत अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

परप्रांतीय तरुणाचे भयंकर कृत्य! भर बाजार पेठेत अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील भर बाजार पेठेतून एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र काही तरुणांनी परप्रांतीय आरोपी तरुणाला जागेवरच रंगेहाथ पकडल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेतील मुलगी तिसरी इयत्तेत शिकत असून ती रमुलनमाथा परिसरात तिच्या कुटुंबासह राहते. सकाळी 8 वाजे दरम्यान ती मुलगी तिचे वडील काम करत असलेल्या दुकानात पैसे आणण्यासाठी गेली होती. ती पुन्हा घरी जात असताना शहरातील भागीरथीबाई शाळा परिसरात रस्त्याने जात असताना एक परप्रांतीय तरुण तिला म्हणाला की माझ्या बरोबर चल, मी तुला तुझ्या आईकडे सोडतो.

तेव्हा त्या मुलीने नकार दिला असता, त्या परप्रांतीय तरुणाने त्या मुलीचा हात धरुन तिला जबरदस्तीने घेऊन जात होता. त्यावेळी त्या मुलीने आरडाओरडा केला. तेथे असलेल्या एका चहा दुकानासमोर शहरातील काही तरुण चहा पीत असताना सदर प्रकार त्यांनी पाहीला. त्यांनी सदर मुलीची चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार तरुणांना सांगीतला. त्यावेळी तरुणांनी मुलीचे अपहरण करून घेऊन जात असलेल्या तरुणाला विचारले असता, त्याने मुका असल्याचे भासवून उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र संतप्त झालेल्या तरुणांनी त्या परप्रांतीय तरुणाची यथेच्छ धुलाई केली. तेव्हा तो बोलू लागला. दरम्यान त्याने चार ते पाच वेळा मोठ्याने शिट्टी मारली.

जणू काही त्याने आपल्या साथीदारांना इशारा दिला अशी माहिती मिळते. त्यानंतर तरुणांनी त्याला पकडून राहुरी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला. सदर तरुण कोणत्या राज्यातील आहे, त्याच्या बरोबर आणखी कोण कोण आहे. याचा तपास पोलीस करत होते. काल गणेशोत्सव सुरु होत असताना बाजारपेठेत प्रचंड गर्दी होती. एवढ्या गर्दीच्या ठिकाणाहून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...