spot_img
अहमदनगरमहिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

spot_img

 

टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती

पारनेर / नगर सह्याद्री :
महिलांमध्ये मोठया प्रमाणावर वाढत चालेल्या स्तनाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून पारनेर-नगर मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या स्तन कर्करोग तपासणी शिबिराला गुरुवारपासून कर्जुले हर्या व पोखरी येथून सुरुवात होत आहे. अशी माहिती निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी दिली.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील कर्जुले हर्या, पोखरी, खडकवाडी व टाकळी ढोकेश्वर या गावांमधून आरोग्य शिबिराला व रक्तदान शिबिरालाला सुरुवात होत आहे. त्यानंतर तालुक्याच्या इतर भागांमध्ये शिबिरे होणार आहेत
आरोग्य यज्ञ २०२४ या थीमखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा शुभारंभ गुरुवारी नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते होणार आहे.
रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ५ लाख रूपयांचे विमा कवच मिळणार आहे. त्यात २ लाख रूपयांचा अपघाती विमा, ३ लाख रूपयांचा जीवन विमा, रक्तदाता तसेच त्याच्या नातेवाईकास १ वर्ष मोफत रक्त देण्यात येणार असल्याचे राणीताई लंके सांगितले. गुरूवार दि. १९ सप्टेंबर रोजी या शिबिरांना कर्जुलेहर्या व पोखरी येथून प्रारंभ होणार असून दि. २९ सप्टेंबर रोजी चास व निंबळक येथे या शिबिरांची सांगता होणार असल्याचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी सांगितले आहे.
आठ दिवसांपासून या शिबिराच्या प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावरील कार्यकर्त्याने महिला स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. महिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. ससून रूग्णालयाची दोन पथके या शिबिरासाठी उपस्थित राहणार असून दररोज १ हजार ते १ हजार २०० महिलांची तपासणी या शिबिरात करण्यात येणार आहे.

शिबिराच्या माध्यमातून आदर्श काम उभे राहणार….
खा.नीलेश लंके प्रतिष्ठानने कोरोना संकटात जगात आदर्श काम केले. आता महिलांचा कॅन्सर तसेच रक्तदान शिबिराच्या माध्यमातूनही आदर्श काम उभे राहिल यात शंका नाही. महिलांच्या स्तन कॅन्सरबाबत जागरूकता वाढली आहे, ती अधिक वाढली पाहिजे यासाठी नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या माध्यमातून हा प्रयोग राबविण्यात येत आहे. या आजारावर लवकर उपचार झाले तर लवकर मात करता येते. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ४ ते ५ रूग्णांना जीवदान मिळणार आहे. अशी माहिती निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी माध्यमांना दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...