spot_img
अहमदनगर"कान्हूरपठार येथे बैल पोळा उत्साहात साजरा"

“कान्हूरपठार येथे बैल पोळा उत्साहात साजरा”

spot_img

कान्हूरपठार। नगर सह्याद्री:-
 येथे श्रावणी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला हा बैलपोळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शहरी भागातील चाकरमानी आवर्जून येत असतात. गावचा पोळा म्हणजे गावकऱ्यांसाठी एक वेगळीच पर्वणी असते कारण गावात वर्षभरात बैल पोळा हा एकमेव सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. सायंकाळी सुभाष ठुबे पाटील यांच्या मानांंच्या बैलाची वाजत गाजत मिरवणूक काढली गेली.ही मानाची जोडी मारुतीच्या पाराला प्रदक्षिणा घालून आल्यानंतर मिरवणुकीस सुरुवात झाली. काही हवशी शेतकऱ्याकडून बैलासमोर नाचण्यासाठी नर्तिकाही आणल्या होत्या. नर्तिकाना नाचण्यासाठी आदल्यादिवशीच स्टेज गावात लावण्यात आले होते. त्या नर्तिकच्या तालावर तरुणाई देखील मोठ्या आनंदाने थिर्कत होती.

पठार भागावरील शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारे वटाणा हे मुख्य पीक पावसा अभावी करपून गेलेली त्या पिकांचेही जेमतेम पैसे झाल्याने शेतकरी वर्गा मध्ये मोठी निराशा निर्माण झाली होती. शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.असे असताना देखील आज ना उद्या पाऊस पडेल व आपल्या शेती मालाचे पैसे होतील या आशेवर आपल्या शेतात वर्ष भर राबणाऱ्या बैल जोडीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणी पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला. गावात कुठलीही मोठी यात्रा नसल्याने गावचा पोळ हिचं गावांसाठी मोठी यात्रा असते.

आधुनिकीकरणांमुळे शेती कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने बैलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. अशा परिस्थितीत देखील आपल्या बैलाचे चांगल्या प्रकारे संगोपन करून त्यांना मिरवणुकीत सहभागी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा यात्रा कमिटीच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला. पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी गावात गौराई ची मोठी यात्रा भरते ही यात्रा पठार भागातील महिला ,मुले शेतकरी यांच्यासाठी पर्वणी ठरते गौराई यात्रेनिमित्त गावातील महिला गौराईची मिरवणूक काढतात. दुपारनंतर ग्रामस्थांकडून कुस्ती शौकीनांसाठी कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात येऊन या आखाडय़ात झालेल्या कुस्त्यांना हजारो रूपयांची बक्षिसे ग्रामस्थांकडून देण्यात येतात येथील आखाडा कुस्तीशौकीन तसेच राज्यातील तसेच परराज्यातील पहिलवानांना पर्वणी समजला जातो.पारनेर पोलीस स्टेशनचे पी.एस आय समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यात्रा कमिटीचे उत्कृष्ट नियोजन!
यात्रा कमिटीने पारंपरिक वेशात नृत्यांगना आणि एकच डीजे लावण्याचे आव्हान सर्व बारीमालकांना केले होते. त्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत यावर्षी सर्व नृत्यांगना पारंपरिक वेशात आणल्या होत्या आणी एकच डीजे लावण्यात आला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा बँकच असुरक्षीत असेल तर सारंच अवघड!

नोकरभरती मुद्यावर विखेंच्या जोडीने थोरातांचीही चुप्पी बरीच बोलकी | कर्डिलेसाहेब, तडा गेल्यास जोडणं अवघडं...

कोतकरांच्या अर्जावर शंकर राऊत यांचा आक्षेप; पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा लागलेले संदीप, सचिन, अमोल कोतकर यांच्या...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी अहमदनगर बंद!

अहमदनगर | नगर सह्याद्री मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथील मराठा आंदोलकांनी आज...

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहिण’ योजनेचा तिसरा हप्त्याची तारीख ठरली; कधी होणार जमा? वाचा..

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे...