spot_img
अहमदनगरनगरकरांनो सोमवार पासून पाणी, लाईट, आरोग्य सेवा राखणार बंद! कारण काय?...

नगरकरांनो सोमवार पासून पाणी, लाईट, आरोग्य सेवा राखणार बंद! कारण काय? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर महानगरपालिका कर्मचार्‍यांचा प्रलंबित सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची प्रकृती खालवली.

त्यामुळे महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारपासून शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, फायर सुविधा, लाईट, आरोग्यसेवा बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपर्यंत आमचा प्रश्न मार्गी न लागल्यास त्यानंतर अन्न बरोबर पाण्याचा त्याग केला जाईल असा इशारा उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल यांनी दिला आहे.

सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मनपा कर्मचार्‍यांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्यांची तब्येत घालवली आहे. सरकारने उपोषणाची दखल घेऊन कर्मचार्‍यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी केली आहे. उपोषणाला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपोषणकर्त्यांचा बीपी वाढला,शुगर लेवल खालवली
महापालिकेसमोर सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर व बाबासाहेब राशिनकर हे उपोषणाला बसले आहेत. जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांना उपोषण स्थळी सलाईन लावण्यात आली. तर बाबासाहेब मुदगल यांनी सलाईन घेण्यास विरोष दर्शवला. उपोषणकर्ते बाबासाहेब राशिनकर यांचा बीपी वाढला असून त्यांनी धोयाची पातळी ओलांडली आहे. याचबरोबर उपोषणकर्त्यांचे सुमारे ४ किलो वजन घटले. शुगर लेवलही खालवली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला असल्याचा आरोग्य विभागाने सांगितले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...