spot_img
अहमदनगरमनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना जामीन मंजूर; 'यांनी' केला फटाके वाजून...

मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना जामीन मंजूर; ‘यांनी’ केला फटाके वाजून जल्लोष

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा आज औरंगाबाद उच्च न्यायालय मध्ये जामीन मंजूर झाला असून समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेसमोर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, पी आर पी जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, आर पी आय उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, गणेश गायकवाड, निखिल साळवे, विकास साळवे, आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे सुरेश बनसोडे म्हणाले की, जे काही जातीयवादी मनुवादी लोकांनी खोट्या गुन्ह्यात अडकून आयुक्त यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्यांना कोर्टाने चपराक दिली असून असे खोटे प्रकार चालत नाही. व अहमदनगर शहरामध्ये शिस्तप्रिय कार्य करणारे अधिकाऱ्याला न्यायालयाने न्याय दिला असल्याचे सांगितले. सुमेध गायकवाड म्हणाले की, आंबेडकरी जनता व समाज आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्या पाठीशी आजही आहे व उद्याही राहणार असून अशा खोट्या गुन्हा दाखल करण्यास जो कोणी खतपाणी घालत असेल त्यालाही आंबेडकरी समाजाच्या वतीने उत्तर देणार असल्याचे सांगितले.

अजय साळवे म्हणाले की, ज्या जातीय मानसिकतेतून ट्रॅप लावण्यात आला होता तो खोटा असल्याचा सिद्ध झाला व विजय हा सत्याचा असतो व अहमदनगर महानगरपालिकेत डॉ.पंकज जावळे यांना पुन्हा नियुक्त करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...