spot_img
अहमदनगरभानुदास कोतकर यांच्यामुळेच नगर बाजार समितीचा राज्यात नावलौकिक

भानुदास कोतकर यांच्यामुळेच नगर बाजार समितीचा राज्यात नावलौकिक

spot_img

जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले | नेप्ती उपबाजार समितीचे भानुदास एकनाथ कोतकर नामकरण सोहळा संपन्न / माजी सभापती भानुदास कोतकर यांचे जंगी स्वागत
सुनील चोभे / नगर सह्याद्री –
नेप्ती उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे. पारदर्शी कारभार करुन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच सलग 15 वर्ष एकहाती सत्ता मतदारांनी दिली आहे. तत्कालीन सभापती भानुदास कोतकर यांच्यामुळेच नगर बाजार समितीने राज्यात नावलौकिक मिळविला आहे. काही कारणांमुळे बाजार समितीची प्रगती खुंटली होती परंतु आता लवकरच बाजार समितीचा विस्तार केला जाणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार समितीचे नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदास एकनाथ कोतकर नामकरण समारंभ सोहळा गुरुवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार अरुण जगताप, माजी सभापती भानुदास कोतकर, माजी आमदार नामदेव पवार, माजी आमदार आण्णासाहेब माने, उद्योजक मंगलदास बांदल, सचिन कोतकर, संचालिका सुरेखाताई कोतकर, माजी उपहापौर सुवर्णाताई कोतकर, सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, युवा नेते अक्षय कर्डिले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, चेअरमन विलास शिंदे, रावसाहेब पाटील शेळके, संतोष म्हस्के, अविनाश घुले, सहसचिव सचिन सातपुते यांच्यासह बाजार समितीचे संचालक, कर्मचारी, केडगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, माजी सभापती भानुदास कोतकर यांचे केडगाव व बाजार समितीच्या विकासात मोठे योगदान आहे. भव्य इमारत उभी करत वैभव मिळवून दिले. पाणी योजना आणली. केडगावची वेगळी ओळख तयार केली.
सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे काम माजी सभापती भानुदास कोतकर यांनी केले आहे. नावलौकिक मिळविलेल्या बाजार समितीला कोतकर यांचे नावे बाजार समितीच्या संचालक मंडळाने देण्याचा निर्णय घेतला याचे समाधान वाटते असे उद्योजक बांदल म्हणाले.

माजी सभापती भानुदास कोतकर यांनी नेप्ती उपबाजार समिती उभारणीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, संचालक मंडळ, कर्डिले साहेब यांच्यामुळे 11 महिन्यात नेप्ती उपबाजार समितीची उभारणी केली. बाजार समिती शेतकऱ्यांचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या विकासाचा कणा आहे. शेतकरी टिकला तर व्यापारी टिकेल, व्यापारी टिकला तर बाजार समिती टिकेल. यात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. नगरमधील शेतकऱ्यांचा माल पुणे, नाशिकला का जातो याचे कारण संचालक मंडळाने शोधले पाहिजे. फक्त नाव देऊन फायदा नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे तरच माझ्या नावाचे सार्थक होईले असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार नामदेव पवार, अक्षय कर्डिले, उदयनराजे कोतकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसभापती रभाजी सूळ, संतोष म्हस्के यांच्यासह बाजार समिती संचालक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सभापती भाऊसाहेब बोठे यांनी प्रस्ताविक केले. सुत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.


शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव द्या, तरच माझे
नाव दिल्याचे सार्थक होईल – माजी सभापती भानुदास कोतकर
मी जरी पुण्याला असलो तरी माझे बाजार समितीमध्ये काय चालते याकडे बारीक लक्ष आहे. बाजार समितीच्या संचालक, सचिव, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बाजार समितीतील आवक घटली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने पुणे, नाशिकला शेतीमाल विक्रीसाठी नेला जात आहे. याची मी सरदवाडीमध्ये गाड्या थांबवून चौकशी केली. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी प्रयत्न करा. तरच बाजार समितीचा नावलौकिक कायम राहिल. संचालक, सचिवांनी बारकाईने लक्ष देवून कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

नातीने केले आजोबांच्या गाडीचे सारथ्य
नेप्ती उपबाजार समितीच्या नामकरण सोहळ्यापूर्वी माजी सभापती भानुदास कोतकर यांचे जंग्गी स्वागत करण्यात आले. जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माजी महापौर संदीप कोतकर व माजी उपमहापौर सुवर्णाताई कोतकर यांच्या कन्या पेशाने आर्किटेक्ट असणाऱ्या श्रुतिका संदीप कोतकर यांनी आजोबा भानुदास कोतकर यांच्या गाडीचे सारथ्य केले. संचिता सचिन कोतकर, साईशा अमोल कोतकर या तिघी बहिनींनी आजोबांना सभास्थळापर्यंत आणले. सभेदरम्यान उदयनराजे संदीप कोतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

केडगावकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत
नेप्ती उपबाजार समितीच्या नामकरण सोहळ्यानिमित्त माजी सभापती भानुदास कोतकर नगरमध्ये आले असता त्यांचे केडगावकरांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. नगर-पुणे महामार्गापासून नेप्ती बाजार समितीच्या गेटपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मी कोतकर समर्थक असा आशय असलेल्या टोप्या आलेल्या कोतकर प्रेमींनी घातल्या होत्या. त्यामुळे मी कोतकर समर्थक हा विषय नगरमध्ये चर्चेचा ठरला.

आता फक्त कार्यक्रम करायचेत ः डॉ. सुजय विखे पाटील
नेप्ती उपबाजार समितीमध्ये गुरुवारी विविध कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले. यात कांदा बाजार भाव डिजीटल फलकाचेही अनावरण करण्यात आले. या कोनशिलेचे अनावरण झाल्यानंतर कांद्याचा आजचा भाव 38 रुपये असल्याचे पहावयास मिळाले. हे सांगतानाच हाच भाव लोकसभेपूर्वी 14 रुपये होता. त्यावेळीच कांद्याला भाव 38 रुपये असता तर मी माजी झालोच नसतो असे डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले. इंग्रजीच महत्व त्यावेळी मी पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतू लोकांना ते पटलं नाही आज ते कळाले. संचालक मंडळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करेल असा विश्वास व्यक्त करत मी तूमच्या सोबत असल्याचे सांगितले. आता माझ्याकडे खूप वेळ आहे. आता फक्त कार्यक्रम करायचे आहेत असे डॉ. विखे पाटील म्हटल्याने सभेत एकच हशा पिकला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...