spot_img
ब्रेकिंग'संभाजीनगर, धाराशिव नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली', सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

‘संभाजीनगर, धाराशिव नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली’, सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

spot_img

नवी दिल्ली: औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिलेला आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

नाव बदलले की, काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच आहेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले आहे. त्याचप्रमाणे सर्वोत महत्त्वाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान अधोरेखीत केला आहे. अलहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखे नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलल्याच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. नाव बदलणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे. त्यासाठी, न्यायालयीन पुनरावलोकनाची गरज नाही. हायकोर्टाने तुमचे म्हणणे ऐकून घेऊन सविस्तर आदेश दिले आहेत. त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

यापूर्वी ८ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे ना छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव कायम राहणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...