spot_img
ब्रेकिंगभाजपच्या अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्राला संधी? पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

भाजपच्या अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्राला संधी? पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून बड्या नेत्याचे नाव पुढे येत आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेपी नड्डा यांची जागा घेऊ शकतात, असे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या भेटीनंतर फडणवीस भाजपचे नवे अध्यक्ष होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभेतील अपयशाची फडणवीसांनी घेतली जबाबदारी
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित विजय मिळाला नाही म्हणून फडणवीस यांनी सत्ताकेंद्रातून बाहेर पडून पक्षाचे काम करण्याची मागणी केली होती. यावेळी फडणवीस यांना राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची अपेक्षा होती. परंतू, केंद्रीय नेतृत्वाने एवढ्यात सत्ता सोडू नये, असे समजावत फडणवीस यांना त्यांची भूमिका मागे घेण्यास लावली होती. राज्यातलं सरकार चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहेभाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीसांचे नाव चर्चेत असल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.

फडणवीसांच्या नावाची चर्चा का?
फडणवीस यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेचे काम केले आहे. मुख्यमंत्री ते राज्यातील गेलेली सत्ता परत आणणे यामध्ये फडणवीस यांनी खेळलेल्या चाली यामुळे ते चर्चेत राहिले आहेत. यामुळे अध्यक्ष पदासाठी फडणवीस स्पर्धेत असलेल्या सर्व नेत्यांपेक्षा योग्य उमेदवार मानले जात आहेत. विशेष म्हणजे फडणवीसांचे शहा आणि मोदींसोबत चांगले संबंध असल्याचे मानले जाते.

फडणवीसांचे संघचालक मोहन भागवत यांच्याशीही चांगले संबंध आहेत. शिवाय फडणवीस संघााचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहेत. तसेच आरएसएस आणि भाजपत अध्यक्ष पदावरून मतभेद होते. मात्र फडणवीसांच्या नावावर दोन्ही गट सहमत होताना दिसत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत
नागपूर आणि महाराष्ट्रातून यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. फडणवीसांनीही पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली जात होती. यामुळे फडणवीसांना अध्यक्ष केले तर अनेक फायदे भाजप पक्ष श्रेष्ठींना दिसत आहेत.

फडणवीसांच्या विरोधात मराठा आंदोलकांमध्ये रोष आहे. लोकसभेला याच वातावरणामुळे फटका बसला होता. फडणवीसांनाच जर केंद्रात घेतले तर हा रोष कमी करता येऊ शकतो. फडणवीसांपूर्वी महाराष्ट्रातूनच विनोद तावडेंचे नाव चर्चेत आले होते. यानंतर सुनील बन्सल यांचेही नाव चर्चेत आले होते. या सर्वांमध्ये फडणवीसांचे नाव सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...