spot_img
अहमदनगरअहमदनगर जिल्ह्यात किती झाली पेरणी? कोणत्या पिकाची सर्वाधिक लागवड,पहा एका क्लिकवर...

अहमदनगर जिल्ह्यात किती झाली पेरणी? कोणत्या पिकाची सर्वाधिक लागवड,पहा एका क्लिकवर…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नगर जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. नगर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी सरासरीच्या १२० टक्क्यांच्या पुढे पेरण्या झालेल्या आहेत. यात सोयाबीन पिकाची १ लाख ६० हजार हेटरवर पेरणी झालेली असून त्याची टक्केवारी ही १८१ टक्के तर तूर पिकाची ७० हजार हेटरवर पेरणी झालेली असून ही सरासरीच्या १९५ टक्के झालेली आहे. मात्र, दुसरीकडे यंदा जिल्ह्यात बाजरी पिकाची पेरणी सरासरीच्या ४६ टक्के झालेली असून बाजरी पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट नोंदवली गेली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

नगर जिल्ह्यात जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ७९ हजार ६७८ हेटर आहे. दरवर्षी पडणारा पाऊस आणि हवामान खात्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे कृषी विभाग खरीप हंगामाच्या पेरण्या प्रस्ताविक करतात. यानुसार यंदा ६ लाख ७९ हजार ७६८ हेटवर खरिपाच्या पेरण्या प्रस्ताविक करण्यात आल्या होत्या. मात्र, पावसाच्या बदललेल्या चित्राने कृषी विभागाच्या अंदाजाला चकवा देत सरासरीपेक्षा अधिक पेरण्या झालेला आहेत.

विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत,जामखेड या भागात खरीप हंगामाच्या शतप्रतीशतपेक्षा अधिक पेरण्या झालेल्या आहेत. या भागात पावसाचे प्रमाण उत्तरेच्या दुप्पट आहे. यामुळे या भागात हंगामातील सोयाबीन, तूर, मका यासह कडधान्य वर्गात मोडणार्‍या उडीद, तूर, मूग, मटकी या पिकांच्या १०० ते १९२ टक्क्यांर्पत पेरण्या झालेला आहे.

जूनच्या पहिल्याच पंधारवाड्यात जिल्ह्यात दमदार पावसाने सुरूवात केली. मात्र, जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा काही भागात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. मात्र, टप्प्याने पेरणी झालेल्या भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदा खरीप हंगामाची स्थिती आतापर्यंत चांगली आहे.

अशी आहे पेरणी
भात ८ हजार ४०२ हेटर (४९ टक्के), बाजरी ६९ हजार १४४ हेटर (४६ टक्के), मका ७९ हजार ३५२ (१३१ टक्के), तूर ७० हजार हेटर (१९३ टक्के), मूग ४९ हजार ६२४ हेटर (१०६ टक्के), उडिद ६१ हजार हेटर (१५१ टक्के), सोयाबीन १ लाख ५७ हजार ७३६ हेटर (१८१ टक्के), कापूस १ लाख ४३ हजार २३५ हेटर (११८ टक्के) अशी पेरणी झालेली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...