spot_img
अहमदनगरकाँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मोठे यश; 84930 शेतकर्‍यांना मिळणार इतका पीक...

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना मोठे यश; 84930 शेतकर्‍यांना मिळणार इतका पीक विमा

spot_img

संगमनेर । नगर सह्याद्री
माजी कृषीमंत्री तथा काँग्रेस विधिंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील 84 हजार 930 शेतकर्‍यांना 128 कोटी 98 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.

इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातून सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले. याचबरोबर त्या काळात सातत्याने शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. महसूल मंत्री आणि कृषिमंत्री म्हणून आमदार थोरात हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय राहिले राज्याचा व्याप सांभाळत असताना त्यांनी संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवली असून या विकासातून संगमनेर तालुका हा मॉडेल ठरला आहे .याचबरोबर उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले आहे.

सतत शेतकरी सर्वसाान्य गोरगरीब यांच्या विकासासाठी काम करणारे आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील 84930 शेतकर्‍यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी मोठा पाठपुरावा केला आणि यातून प्रधानंत्री पिक विमा योजनेमधून 2023 धून अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक पिक विमा हा संगमनेर तालुक्याला मंजूर झाला आहे. यामध्ये नुकसान भरपाईची आग्रिम रक्कम 33.86 कोटी रुपये मंजूर झाली असून स्थानिक आपत्ती मुळे नुकसान
झालेल्या शेतीसाठी 10 लाख 65 हजार रुपये आणि अंति पीक कापणी प्रयोगावरून आलेल्या उत्पन्नावर आधारित विमा रक्कम एकूण 95 कोटी 1 लाख रुपये असे एकूण 128 कोटी 98 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या पिक विमा उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, ओरिएंटल क्रोप इन्शुरन्स कंपनी, सर्व मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक याचबरोबर सोसायटी व ग्रापंचायतचे पदाधिकारी यांनी मोठी मदत केली.
शेतकर्‍यांना हा पिक विमा बँक खात्यावर मिळणार असल्याने संगमनेर तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...