spot_img
अहमदनगरभारत मातेचा जयजयकार करत धावले शेकडो खेळाडू; क्रीडा भारतीची ऑलिम्पिक दौंड उत्साहात

भारत मातेचा जयजयकार करत धावले शेकडो खेळाडू; क्रीडा भारतीची ऑलिम्पिक दौंड उत्साहात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा भारतीच्या वतीने नगर शहरात ऑलिम्पिक दौंडचे आयोजन केले होते. या मध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू उत्स्फूर्तपणे सहभागी होत भारत मातेचा जयजयकार करत, तिरंगा फडकावत व ज्योत घेवून शेकडो खेळाडू धावले. ऑलिम्पिक दौंडची सुरुवात श्रीराम चौकातून होवून प्रमुख भागांमध्ये फिरून प्रोफेसर कॉलनी चौकातील समर्थ शाळेच्या मैदानात समारोप झाला.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, क्रीडा भारतीचे शहराध्यक्ष सुधीर चपळगावकर, जिल्हा उपाध्यक्ष शशीकांत खिस्ती, मंत्री अमोल धोपावकर, छीवछत्रपती पुरस्कार विजेते निर्मल थोरात, प्रा.मनीषा पुंडे, समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य सुरेश क्षिरसागर, देवेंद्र वैद्य, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक शंकर बारसे, अजय धोपावकर, शशीकांत खिस्ती, वेदपाल तन्वर व प्रा.बाळासाहेब कडूस आदींसह विविध क्रीडा प्रशिक्षण केंद्रांचे पदाधिकारी व मोठ्या संख्यने सर्व खेळांचे खेळाडू उपस्थित होते.

खेळाडूंना मार्गदर्शन करताना नानासाहेब जाधव म्हणाले, खेळ हा शरीर, मन व बुद्धीच्या विकासाचा आधार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे. १९९२ पासून पूर्ण देशात क्रीडा भारती क्रीडा क्षेत्रात काम करत आहे. नगरमध्येही आता क्रीडा भारतीचे चांगले काम सुरु आहे.

प्रास्ताविकात सुधीर चपळगावकर म्हणाले, नगरच्या खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेची माहिती मिळावी व क्रीडा ज्योतीचे महत्व कळावे यासाठी क्रीडा भारतीने या ऑलिम्पिक दौडचे आयोजन होते. भारतीय संघ यावर्षी ऑलिम्पिक मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करत भारतास सुवर्णपदके मिळवून देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक मिशन सुरु करून २०३६ साली भारताला ऑलिम्पिक स्पर्धाचे यजमानपद मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

यावेळी शंकर बारसे, अजय धोपावकर, सुरेश क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्ती धोपावकर यांनी केले. उपाध्यक्ष उमेश झोटींग यांनी आभार मानले. यावेळी क्रीडा भारतीचे उपाध्यक्ष स्नेहा खिस्ती, निमंत्रित सदस्य अनंत देसाई, सहमंत्री पोपट लोंढे, कोषाध्यक्ष आशुतोष कुकडे, संपर्कप्रमुख अक्षय कर्डिले, कार्यकारिणी सदस्य रविकुमार पंतम, प्रा.सुनिल जाधव, राजन आसलकर, संकल्प थोरात, उन्मेष शिंदे, विकास परदेशी, कु. गायत्री गारडे, राजकुमार धोत्रे, अभय सातपुते, प्रणिता तरटे, गणेश वाळुंजकर, गोर्डे व किरण पवार उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...