spot_img
अहमदनगरआमदार संग्राम जगताप यांचे यशस्वी पाऊल; सरकारने दिला ग्रीन सिग्नल

आमदार संग्राम जगताप यांचे यशस्वी पाऊल; सरकारने दिला ग्रीन सिग्नल

spot_img

डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांचा पाठपुरावा | शासनाच्या मान्यतेचे आयुक्तांना पत्र
अहमदनगर | नगर सह्याद्री

शहरातील सावेडी येथे महिला व बालविकास भवन तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत अहमदनगर महापालिकेने केलेल्या विनंतीस महाराष्ट्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंय बगाडे यांनी नगर महापालिका आयुक्तांना तसे मान्यतेचे पत्र दिले आहे. या संदर्भात माजी खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे या पत्राने अधोरेखित झाले आहे.

सावेडी येथील सर्वे नंबर २३२ /१ अ/ ते ६, २४२/१ पैेकी या जागेमधील महापालिकेच्या मालकीची ४४११.५० चौरस मीटर ही जागा अहमदनगर जिल्हा मुख्यालय ठिकाणी महिला व बालविकास भवन तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी उपलब्ध करण्यासदंर्भात अहमदनगर महापालिकेने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे अर्ज केला होता. त्या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद दाखवून नगरविकास विभागाने नममात्र एक रुपया दराने ३० वर्षांकरिता भाडेतत्त्वावर ही जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी काही अटी नगरविकास विभागाने घातल्या आहेत.

संबंधित जागा ज्या कारणासाठी दिली आहे, त्याच कारणासाठी वापरण्यात येईल याची दक्षता घ्यावी. संबंधित जागा भाडेतत्त्वावर देण्यापूर्वी रीतसर आवश्यक अटींसह महापालिकेने करारनामा करावा. जागा देताना कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. या संदर्भात कोणतीही कायदेशीर बाब उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या आयुक्तांवर असणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनिय २६ नोव्हेंबर २०२३ व नगरविकास विभाग शासन निर्णय नामपा १२२१/प्र. क्र. १६६ नवि. २६. दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ मधील संबंधित अटी वा शतींचे पालन करण्यात यावे, असे घातलेल्या अटी किंवा शर्तींमध्ये म्हटले आहे.

शहर विकासाची विखे-जगताप सहमती एसप्रेस सुसाट
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासाठी एकत्र येत उड्डाणपूलाचे काम मार्गी लावले. तसेच नगर कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील पुलासाठी निधी मंजूर करून आणला आहे. शहर विकासासाठी भरीव निधी आणला आहे. डॉ. विखे व आ. जगताप यांच्या शहर विकासाच्या सहमती एसप्रेसमुळे शहराच्या विकास कामांत मोठी भर पडत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...