spot_img
ब्रेकिंगपुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस; 'या' भागात ऑरेंज अलर्ट

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला आहे. जूनमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर चिंता वाढली होती. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यावर्षी वरुणराजा रुसला की काय अशी परिस्थिती होती. पण, जुलै महिना सुरु होताच पावसाने राज्यात जोरदार एन्ट्री केली आणि सारेच सुखावले. जुलै महिन्याच्या १ तारखेपासूनच मान्सूनने राज्यात जोर धरला असून या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊन जून महिन्याची कसर भरुन निघणार आहे. मान्सूनने अखेर राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्य मान्सूनने गेल्या काही दिवसात व्यापलं आहे. जुलै महिन्याच्या पहिले चार दिवस मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस झाला. तर आता पुढील पाच दिवसही राज्यात जोरदार पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे.मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. तर, येत्या काही तासात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शयता आहे. तर, पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागांना पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई-ठाणे, पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शयता आहे. पुणे, कोल्हापूरमध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, विदर्भातही पावसाची शयता आहे. येथील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भाग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसेल.

सिंधुदुर्ग, कोल्हापूरात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस (५ ते १० जुलै) हे पावसाचे असेल. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातार्‍याला पावासाच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, पालघरसह कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? ‘ते’ नियम तुम्हाला माहित आहे का? ‘या’ 5 गोष्टींचा करावा लागतो सराव..

नगर सहयाद्री वेब टीम:- आजकाल ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड हे कागदपत्र...

आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? कीती रुपयांची कपात होणार..

मुंबई । नगर सहयाद्री:- कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. कच्चा ऑईलमध्ये मार्चपासून ते...

महायुती नवा डाव टकाकणार! मध्यरात्री बैठक; विधानसभेचा जाहीरनामा ठरला? ‘या’ प्रश्नांना देणार प्राधान्य..

Politics News: लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे...