spot_img
अहमदनगरआ. जगताप यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा! पहा काय म्हणाले...

आ. जगताप यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा! पहा काय म्हणाले…

spot_img

विकासासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन
अहमदनगर। नगर सहयाद्री
निवडणूक आली म्हणून विकास कामे नाही, शहरात विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले असून, ते फक्त निवडणुकीच्या जत्रे पुरतेच मर्यादीत राहणार आहे, असा खोचक टोला आमदार संग्राम जगताप यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला आहे.

सर्जेपुरा परिसरातील विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी विरोधकांवर जोरदार तोफ डागली. अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यातच आमदार जगताप यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

यावेळी बोलतांना आ. जगताप म्हणाले, शहरात व उपनगरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा कोणताही परिसर शिल्लक राहिला नाही. जेथे विकासांची कामे झाली नाही. आता सर्वच ठिकाणी विकासकामातून कायापालट झाला आहे. आजपर्यंत कब्रस्तानासाठी इतिहासात एवढा मोठा निधी कोणत्याही लोकप्रतिनिधीने दिलेला नाही. निवडणूक आली म्हणून विकास कामे केली नाही. शहरात विकास कामांचे सातत्याने सुरू आहेत. विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले आहे. ते फक्त निवडणुकीच्या जत्रे पुरतेच मर्यादीत राहणार आहे, असा टोलाही आमदार जगताप यांंनी लगावला आहे.

कोट्यावधीचा निधी रस्त्यांच्या कामासाठी आणला. शहर व उपनगरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात आहे. निवडणूक आल्यावर पुढेपुढे करणार्‍या राजकीय पुढार्‍यांना कोरोनाच्या संकट काळात कुठे होता? हे प्रश्न विचारण्याची गरज आहे. निवडणूक आल्यामुळे ते सर्वांकडे जात असल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला.दरम्यान रामवाडी, सर्जेपुरा परिसरातील हजरत सय्यद जलाल शहा बुखारी कब्रस्तानमध्ये हॉल बांधणे (भटारखाना) व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी मोहरमनिमित्त बारा इमाम कोठला येथील रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी आमदार जगताप यांच्याकडे करण्यात आली.

याप्रसंगी माजी समाज कल्याण अधिकारी रफीक मुन्शी, फारूक बिलाल, नगरसेवक समद खान, मुजाहिद (भा कुरैशी), राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते खान बाबा, आरिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, उद्योजक वाहिद हंडेकरी, विश्व मानवाधिकारचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, फारूक नालबंद, यासर शेख, आरपीआयचे (गवई) शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शाहनवाज शेख, तनवीर पठाण, शहबाज बॉसर, अब्दुल खोकर, आदिल शेख, इमरान शेख, सोहेल खान, सोहेल जहागीरदार, बरकत चुडीवाला, राजीक शेख, अकरम शेख आदी उपस्थित होते.

विरोधाकांचे जीवनच झिरो झाले
३८ ते ३९ हजार पथदिवे बसवून शहरातील अंधकार दूर करण्यात आला. यापूर्वी कधी एवढे दिवे लागले नाही, त्याचे नियोजन करुन पथदिवे बसविण्यात आले. मात्र ज्या विरोधकांचे जीवनच झिरो झाले आहे, त्यांना हे दिवे झिरो बल्ब दिसत आहे, अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.

राजकारणात काय घडेल यांचा काही नेम नाही
पक्षाचे व राजकीय गणित सोडून विकास काम करणार्‍या लोकप्रतिनिधींवर विश्वास टाकून जबाबदारी सोपवा. बाकीचे पाहू नका. टोकाची भूमिका असलेले पक्ष राजकीय सत्तेसाठी एकत्र आले, उद्या राजकारणात काय घडणार? हे कोणी सांगू शकत नाही. विकासासाठी सर्वांनी एकजुटीने मागे उभे राहण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...