spot_img
अहमदनगर'महापालिकेच्या विभागांना भ्रष्टाचाराची कीड' २०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी केव्हा कारवाई करणारा? किरण...

‘महापालिकेच्या विभागांना भ्रष्टाचाराची कीड’ २०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी केव्हा कारवाई करणारा? किरण काळेंचा संतप्त सवाल

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
मनपातील बड्या अधिकाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत कारवाई केली. उशिरा का होईना पण सुचलेल्या या शहाणपणा बद्दल काँग्रेसच्या वतीने लाच लुचपत विभागाच्या कारवाईचे स्वागत करत आहोत. ७०० हून अधिक बनावट कॉलिटी कंट्रोलचे खोटे टेस्ट रिपोर्ट तयार करून सुमारे २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याप्रकरणी अँटी करप्शन प्रमुख विश्वास नागरे पाटील यांच्याकडे सर्व पुराव्यांसह फिर्याद दाखल केली आहे. आठ महिने उलटली तरी देखील अद्यापही यात कारवाई नाही. ही कारवाई कधी करणार, असा संतप्त सवाल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी विभागाला केला आहे.

काळे म्हणाले की, नगर मनपा भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे. नगररचना, बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत यासह सगळ्याच विभागांना भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. महानगरपालिकेत अधिकारी नगरकरांना सेवा देण्यासाठी नव्हे तर स्वतःचे खिसे भरण्यासाठी बसतात. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराच्या साखळीमध्ये केवळ अधिकारीच नाही तर अनेक राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी देखील बरबटलेले आहेत. यामुळेच नगर शहराची खड्ड्यांचे शहर, कचऱ्याचे शहर म्हणून ओळख झाली आहे. अमृत सारखी योजना कोट्यावधी रुपये खर्च करून देखील प्रचंड भ्रष्टाचार, घोटाळा झाल्यामुळे नागरिकांना आजही दररोज स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत नाही.

या माध्यमातून शहरात मनपाची स्थापना झाल्यापासून जवळपास मागील वीस वर्षांमध्ये काही हजार कोटींचा भ्रष्टाचार शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची कामे करताना तसेच मनपा फंडातून कामे करताना झाला आहे. यासंदर्भात मी स्वतः बनावट टेस्ट रिपोर्टचे पुरावे दाखल केले आहेत. वेळोवेळी आंदोलनाचा इशारा दिला. मात्र पोलिसांनी तत्पूर्वीच ताब्यात घेत आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मनपाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र जे चोऱ्या करतात ते स्वतःवर आणि स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार? त्यामुळे आता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बनावट टेस्ट रिपोर्ट प्रकरणातील २०० कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळा भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यात देखील अशाच पद्धतीची कारवाई करावी असे किरण काळे यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...